Ankita Lokhande : 'मला आत बोलावून...' निर्मात्यानं अंकिताकडं केली विचित्र मागणी; अभिनेत्रीचा धक्कादायक खुलासा
- Published by:Nishigandha Kshirsagar
Last Updated:
चित्रपट असो किंवा टीव्ही इंडस्ट्री, अनेक अभिनेत्रींनी अनेकदा कास्टिंग काउचचा सामना केला आहे, त्याविषयी स्पष्टपणे मत व्यक्त केलं आहे. आता अंकिता लोखंडेनेही कास्टिंग काउचशी संबंधित तिचा अनुभव शेअर केला आहे. 'पवित्र रिश्ता'मधून अंकिताला लोकप्रियता मिळाली. ती बिग बॉस 17 ची फायनलिस्ट होती. पण अंकिता अजून चित्रपटसृष्टीत नाव कमाऊ शकली नाही. नुकतंच अंकिताने तिला कास्टिंग काउचचा आलेला धक्कादायक अनुभव सांगितला आहे.
advertisement
1/8

चित्रपट असो किंवा टीव्ही इंडस्ट्री, अनेक अभिनेत्रींनी अनेकदा कास्टिंग काउचचा सामना केला आहे, त्याविषयी स्पष्टपणे मत व्यक्त केलं आहे. आता अंकिता लोखंडेनेही कास्टिंग काउचशी संबंधित तिचा अनुभव शेअर केला आहे.
advertisement
2/8
'पवित्र रिश्ता'मधून अंकिताला लोकप्रियता मिळाली. ती बिग बॉस 17 ची फायनलिस्ट होती. पण अंकिता अजून चित्रपटसृष्टीत नाव कमाऊ शकली नाही.
advertisement
3/8
अंकिता लोखंडेने हॉटरफ्लायला दिलेल्या मुलाखतीत कास्टिंग काऊचविषयी खुलासा केला आहे.
advertisement
4/8
याविषयी बोलताना ती म्हणाली, “मी एका साऊथ चित्रपटासाठी ऑडिशन द्यायला गेले होते. मला फोन आला की तुमची निवड झाली आहे आणि शेवटी पेपरवर सही करायला या.''
advertisement
5/8
''मला खूप आनंद झाला, मी आईलाही सांगितलं. पण एका मोठा चित्रपटासाठी एवढ्या सहजतेनं माझी निवड कशी झाली याबद्दल माझ्या मनात शंका आली. '' असं अंकिता म्हणाली.
advertisement
6/8
अंकिता लोखंडे पुढे म्हणाली, ''जेव्हा मी सही करायला गेले तेव्हा त्यांनी मला आत बोलावलं आणि माझ्या सोबत आलेल्या साथीदाराला बाहेरच थांबायला सांगितलं. आत गेल्यावर ते मला म्हणाले, ''तुला तडजोड करावी लागेल.' मी त्यावेळी फक्त १९ वर्षांची होते. 'त्यावेळी मला फक्त हिरोईन व्हायचंय’ हेच डोक्यात होतं.''
advertisement
7/8
अंकिता लोखंडे म्हणाली, ''मी जरा हुशारीनं पुन्हा विचारलं, तेव्हा तो मला म्हणाला, ‘तुला निर्मात्यासोबत झोपावं लागेल.’
advertisement
8/8
'हे ऐकून मी त्याला म्हणाले, तुझ्या निर्मात्याला गुणी अभिनेत्री नाही तर झोपायला फक्त एका मुलीची गरज आहे आणि मी ती नाही' असं म्हणून मी तिथून तातडीनं निघाले.' असा धक्कादायक खुलासा अंकिताने केला आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
Ankita Lokhande : 'मला आत बोलावून...' निर्मात्यानं अंकिताकडं केली विचित्र मागणी; अभिनेत्रीचा धक्कादायक खुलासा