TRENDING:

Ankita Walawalkar : हे फक्त स्वप्न नव्हतं..! कोकण हार्टेड गर्लनं गुढीपाडव्याला अखेर रिव्हील केलं, Good News समोर आलीच

Last Updated:
Ankita walawalkar : अंकिता आणि कुणाल यांनी गुढीपाडव्याच्या दिवशी गुड न्यूज शेअर केली. ती गुड न्यूज काय आहे हे अंकिताने पोस्ट लिहित सांगितलं.
advertisement
1/7
 हे फक्त स्वप्न नव्हतं..! कोकण हार्टेड गर्लनं गुढीपाडव्याला अखेर रिव्हील केलं, Good News समोर आलीच
बिग बॉस मराठी फेम कोकण हार्टेड गर्ल गेल्या काही दिवसांपासून तिच्या गुड न्यूजमुळे सोशल मीडियावर चर्चेत होती.
advertisement
2/7
अंकिताचं वर्षभरापूर्वी लग्न झालं. लग्नानंतर अंकिता आई होणार आणि हिच गुड न्यूज असल्याचं तिच्या चाहत्यांना वाटलं होतं. गुड न्यूज आहे पण तुम्ही समजताय ती नाही असंही तिनं सांगितलं होतं.
advertisement
3/7
अखेर गुढीपाडव्याच्या दिवशी कोकण हार्टेड गर्लने तिच्या नवऱ्याबरोबर तिची खरी गुड न्यूज चाहत्यांबरोबर शेअर केली आहे. अंकिताने शेअर केलेली पोस्ट चर्चेत आली आहे.
advertisement
4/7
अंकिता आणि कुणाल यांनी नवीन घर खरेदी केलं आहे. हे फक्त स्वप्न नव्हतं, ती माझी जिद्द होती असं म्हणत तिनं नव्या घरातील फोटो शेअर केलेत.
advertisement
5/7
अंकिता आणि कुणाल यांनी पनवेलमध्ये त्यांचं नवीन घर खरेदी केलं आहे. ऑफिशिअली पनवेलकर असं तिने म्हटलं आहे. त्याबरोबर तिनं पोस्टही शेअर केली आहे.
advertisement
6/7
अंकिताने पोस्टमध्ये लिहिलंय, "घर घेणं… हे फक्त स्वप्न नव्हतं, ती माझी जिद्द होती. मुंबईत आले तेव्हा सिव्हिल इंजिनियर म्हणून इतरांची घरं बांधत होते…पण मनात एकच विचार “माझं घर कधी?”मी कुठेतरी वाचलं होतं स्वप्नं नेहमी आपल्या लायकीपेक्षा मोठी बघायची.कारण लायकी आपण वाढवू शकतो."
advertisement
7/7
वाचा अंकिताची संपूर्ण पोस्ट. अंकिताने नव्या घराचे फोटो शेअर करत चाहत्यांनी तिला शुभेच्छा दिल्या आहेत. "अभिमान पैशांचा नाही.अभिमान आहे त्या प्रवासाचा.जर तुम्हीही घराचं स्वप्न पाहत असाल तर लोक काय म्हणतात ते विसरा.उशीर झाला तरी चालेल…पण जिद्द जिवंत ठेवा. कारण घर जिद्दीने बांधलं जातं", असंही अंकिताने म्हटलं आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
Ankita Walawalkar : हे फक्त स्वप्न नव्हतं..! कोकण हार्टेड गर्लनं गुढीपाडव्याला अखेर रिव्हील केलं, Good News समोर आलीच
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल