TRENDING:

Ankita Walawalkar : वोटींग लाईन्स बंद तरी 'कोकण हार्टेड गर्ल' घराबाहेर? भाऊच्या धक्क्यावर अंकिताबरोबर नेमकं काय घडलं?

Last Updated:
बिग बॉस मराठीच्या घरात पाचव्या आठवड्याचा भाऊचा धक्का पार पडला. पाचवा आठवडा सरत आला आणि आता सदस्यांचे खरे चेहरे दिसू लागले. भाऊच्या धक्क्यावर अंकिता वालावलकरला रितेशनं चांगलाच धक्का दिला आहे.
advertisement
1/7
वोटींग लाईन्स बंद तरी 'कोकण हार्टेड गर्ल' घराबाहेर? भाऊच्या धक्क्यावर काय घडलं?
रविवारी भाऊचा धक्का सुरू होण्याआधी एक प्रोमो समोर आला ज्यात अंकिता वालावलकर घरातून बाहेर पडत असल्याचं दाखवण्यात आलं. अंकिताला कमी वोट मिळाल्यानं ती आऊट झाल्याचं पाहायला मिळत होतं.
advertisement
2/7
खरंच अंकिता वालावलकर घराबाहेर गेली का असं सर्वांना वाटलं होतं. कारण या आठवड्यात सर्व वोटिंग लाईन्स बंद ठेवण्यात आल्या होत्या. त्यामुळे हा आठवडा नो एलिमिनेशनचा होता.
advertisement
3/7
पण वोटिंग लाईन्स बंद असताना देखील खरंच अंकिता वालावलकर घराबाहेर पडली का? भाऊच्या धक्क्यावर नेमकं काय घडलं?
advertisement
4/7
अंकिता वालावलकर, वर्षा उसगावकर, निक्की तांबोळी आणि अभिजीत सावंत नॉमिनेशनमध्ये होते. सर्वात आधी अभिजीत सेफ झाला त्यानंतर निक्की आणि नंतर अंकिताला कमी वोट्स मिळाल्याने तिचा घरातील प्रवास संपल्याचं सांगण्यात आलं.
advertisement
5/7
अंकिताला घरातील नावाची पाटी घेऊन बाहेर येण्यास सांगण्यात आलं. अंकिताला घराबाहेर पडताना पाहून घरातील सगळ्या सदस्यांना रडू कोसळलं. सूरज आणि डीपी दादांना तर रडू कोसळलं.
advertisement
6/7
अंकिता नावाची पाटी घेऊन दरवाजासमोर उभी राहिली. अंकिता भावुक होत घराबाहेर पडली. घराचा मुख्य दरवाजा उघडण्यात आला आणि दरवाजावर आरसा बसवण्यात आला. त्या आरशावर लिहिण्यात आलं होतं, दुसऱ्याला नाव ठेवण्यापेक्षा आधी स्वत:चं बघा. अपेक्षा आहेत.
advertisement
7/7
याचाच अर्थ अंकिता घरातून बाहेर पडली नाही. अंकिताला रितेशनं रिअलिटी चेक दिला. अंकिता पुन्हा घरात आल्यानंतर रितेश म्हणाला, आठवडा तुम्ही तुमचा गेम खेळलात म्हणून आज मी तुमच्याबरोबर हा गेम खेळलो.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
Ankita Walawalkar : वोटींग लाईन्स बंद तरी 'कोकण हार्टेड गर्ल' घराबाहेर? भाऊच्या धक्क्यावर अंकिताबरोबर नेमकं काय घडलं?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल