TRENDING:

Apurva Nemlekar : 10 वर्षांचं अफेअर पण दोन वर्षही नाही टिकलं लग्न, शेवंताची सॅड स्टोरी

Last Updated:
Apurva Nemlekar : अभिनेत्री अपूर्वा नेमळेकर सध्या शुभ विवाह या मालिकेत काम करतेय. मालिकेत जरी तिचं लग्न दाखवण्यात येत असलं तरी खऱ्या आयुष्यात अपूर्वाचं लग्न मात्र आठ वर्षांआधीच मोडलं.
advertisement
1/8
10 वर्षांचं अफेअर पण दोन वर्षही नाही टिकलं लग्न, शेवंताची सॅड स्टोरी
रात्रीस खेळ चाले या प्रसिद्ध मालिकेतून शेवंता बनून प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारी अभिनेत्री अपूर्वा नेमळेकर. अनेक वर्ष मालिका विश्वात काम करणाऱ्या अपूर्वाला बिग बॉस मराठीमुळेही नवी ओळख मिळाली.
advertisement
2/8
छोट्या पडद्यावर ग्लॅमरस दिसणारं अपूर्वा नेमळेकरचं वैयक्तिक आयुष्य मात्र अनेक कठीण प्रसंगांनी भरलेलं आहे. अपूर्वाने एका मुलाखतीत तिच्या लव्ह लाइफ आणि डिवोर्सबद्दल सांगितलं होतं.
advertisement
3/8
अपूर्वा दहा वर्ष रिलेशनमध्ये होती. तिनं लग्न केलं मात्र ते लग्न फार काळ टिकलं नाही. आयुष्यात आलेल्या प्रसंगांमधून अपूर्वाला दुनियादारी शिकवली.
advertisement
4/8
राजश्री मराठीला दिलेल्या मुलाखतीत बोलताना अपूर्वा म्हणाली, "खूप लोकांनी दुनियादारी शिकवली. काही जवळच्या फ्रेंड्सनी खरी परिस्थिती माहिती असताना खोटी चित्र माझ्यासमोर उभी केली. फसवणूक काय असतं याची चव दिली त्यांना मी आयुष्यात कधीच विसरणार नाही."
advertisement
5/8
अपूर्वाने तिच्या डिवोर्सवर भाष्य केलं. ती म्हणाली, "ज्याच्यावर आपण जीवापाड प्रेम असतं, माझं दहा वर्षांचं माझं अफेअर होतं. त्यानंतर आम्ही लग्न केलं होतं, छोटी गोष्ट नाहीये. त्यानंतर डिवोर्स झाला. आज आठ वर्ष मी सिंगल आहे."
advertisement
6/8
"लोकांना असं वाटतं शेवंता सिंगल आहे, हो आहे. मी वेळ घेतला तेवढा. जेव्हा तुम्ही मनातून हर्ट होता तेव्ह तुम्हाला वेळ लागतो. तुम्ही एका माणसाकडून दुसऱ्या माणसाकडे उडी नाही मारू शकत. पळवाट नाही शोधू शकत, स्टेबिलिटी लागते आणि ती आहे माझ्यात किंवा मी स्वत:ला त्या पद्धतीने डेव्हलप केलं आहे."
advertisement
7/8
"त्या सगळ्या लोकांचे मी आभार मानते. त्यांनी मला अशा परिस्थिती टाकलं की माझ्याकडे काही ऑप्शन नव्हता, सक्सेस होण्याशिवाय आणि काही करून दाखवण्याशिवाय."
advertisement
8/8
2017 साली अपूर्वाचे बाबांचा मृत्यू झाला. तिच्या डोळ्यांदेखत त्यांना हार्ट अटॅक आला आणि त्यांचं निधन झालं. त्याच काळात अपूर्वाचा डिवोर्सही झाला होता. दोन महत्त्वाचे पुरूष तिच्या आयुष्यातून निघून गेले होते. 2014 मध्ये रोहन देशपांडेबरोबर झालं होतं. पण त्यांचं लग्न फार काळ टिकलं नाही.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
Apurva Nemlekar : 10 वर्षांचं अफेअर पण दोन वर्षही नाही टिकलं लग्न, शेवंताची सॅड स्टोरी
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल