TRENDING:

'मी BJP ला वोट दिलं', मतदान करून आलेल्या आरोह वेलणकरची पोस्ट चर्चेत, सांगितलं त्यामागचं कारण

Last Updated:
प्रसिद्ध अभिनेता आरोह वेलणकर याने कोणाला मतदान केलं हे जाहिररित्या सांगून टाकलं आहे. आरोहची पोस्ट चर्चेत आली आहे.
advertisement
1/7
'मी BJP ला वोट दिलं', मतदान करून आलेल्या आरोह वेलणकरची पोस्ट चर्चेत
मुंबई, पुणे, ठाणे, नाशिक, नागपूरसह 29 महानगरपालिकांसाठी मतदान प्रक्रिया सुरू झाली आहे. मतदारांनी मतदान केंद्रांवर गर्दी केली आहे. तरुणांपासून ज्येष्ठांपर्यंत सर्व स्तरातील नागरिक मतदानासाठी उत्साहाने बाहेर पडलेले दिसत आहेत. अनेक कलाकारांनीही सकाळपासून मतदान केंद्रावर हजेरी लावत मतदानाचा हक्क बजावला आहे. कलाकारांनी मतदान करत इतरांनाही मतदान करण्याचं आवाहन केलं आहे.
advertisement
2/7
निवडणूक प्रक्रियेत आपण कोणाला मत दिलं हे गुपित ठेवणं अपेक्षित असतं. मतदान गोपनीय असावं हा लोकशाहीचा एक महत्त्वाचा नियम मानला जातो. मात्र प्रसिद्ध मराठी अभिनेता आरोह वेलणकरने कोणाला मत दिलं हे थेट सांगून टाकलं आहे. आरोह वेलणकरची पोस्ट सोशल मीडियावर चर्चेत आली आहे.
advertisement
3/7
मराठी अभिनेता आरोह वेलणकरने महानगरपालिकांसाठी मतदान केल्यानंतर त्याच्या फोटोसह पोस्ट लिहिली आहे. आरोहनं स्वत:चा बोटाला शाई लावलेला फोटो शेअर केला आहे.
advertisement
4/7
पोस्टमध्ये त्याने लिहिलंय, "मी महाराष्ट्र महापालिका निवडणुकांमध्ये भाजपसाठी मतदान केलं आहे. प्रगतीला बळ देण्यासाठी, शाई लागलेल्या बोटातून एक एक पाऊल पुढे! तुम्ही मतदान केलं का?" आरोहची ही पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होतोय.
advertisement
5/7
आरोह वेलणकर हा मराठी रंगभूमी, मालिका आणि सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता आहे. आरोह सोशल मीडियावरही सक्रिय असून विविध सामाजिक आणि वैयक्तिक विषयांवर तो आपली मतं व्यक्त करत असतो. याआधीही त्याने काही मुद्द्यांवर स्पष्ट भूमिका मांडली आहे.
advertisement
6/7
आरोहबरोबर अभिनेता शंशाक केतकरनंही सकाळीच मतदान केंद्रावर हजेरी लावत मतदानाचा हक्क बजावला. पण मतदान करून बाहेर आला असता शशांकला मतदान केंद्राबाहेरची दयनीय अवस्था पाहायला मिळाली. ठाण्यातील ज्या इंटरनॅशनल शाळेत मतदान केंद्र होतं, त्याच्या बाहेर कचऱ्याचा ढीग पडला होता. शशांकनं व्हिडीओ शेअर करत हे सगळ्यांच्या लक्षात आणून दिलं. 
advertisement
7/7
संस्कृती बालगुडे, उर्मिला कानिटकर, प्राजक्ता माळी, शशांक केतकर, हेमंत ढोमे, क्षिती जोग, नाना पाटेकर, मिलिंद गवळी, सुबोध भावे, चिन्मयी सुमित, वीणा जामकर या कलाकारांनाही मतदानाचा हक्क बजावला.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
'मी BJP ला वोट दिलं', मतदान करून आलेल्या आरोह वेलणकरची पोस्ट चर्चेत, सांगितलं त्यामागचं कारण
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल