'कुणी बायको देता का बायको?' मुंबईच्या रस्त्यांवर फिरणारा 'हा' व्हायरल पोस्टर बॉय आहे तरी कोण? समोर आलं मोठं सरप्राइज
- Published by:Pratiksha Pednekar
Last Updated:
सध्या मुंबईच्या लोकल स्टेशन्सवर, बस थांब्यांवर आणि उन्हातान्हात एक तरुण हातात “बायको पाहिजे” असं पोस्टर घेऊन वणवण भटकताना दिसतोय. व्हायरल पोस्टर बॉय नेमका आहे कोण?
advertisement
1/8

दक्षिणेत रश्मिका मंदाना आणि विजय देवरकोंडाच्या लग्नाची धामधूम अजून शांत झालेली नाही, तोच आता मुंबईच्या रस्त्यांवर एका वेगळ्याच लग्नाची चर्चा रंगली आहे. पण हे अद्याप हे लग्न झालेलं नाही, किंवा ठरलेलंही नाही. उलट बायको शोधण्यापासून सुरुवात आहे.
advertisement
2/8
सध्या मुंबईच्या लोकल स्टेशन्सवर, बस थांब्यांवर आणि उन्हातान्हात एक तरुण हातात “बायको पाहिजे” असं पोस्टर घेऊन वणवण भटकताना दिसतोय. विशेष म्हणजे, हा केवळ पोस्टर लावून थांबला नाहीये, तर येणाऱ्या-जाणाऱ्या प्रवाशांना चक्क स्वतःची माहिती असलेली पॅम्प्लेट्स वाटत आहे.
advertisement
3/8
या पोस्टर बॉयचं नाव आहे धनराज धोंडीराज दांगट. त्याचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला असून त्यात तो अतिशय निरागसपणे लोकांना विचारतोय, "मी धनराज धोंडीराज दांगट. बायको शोधतोय. तुमच्या ओळखीत आहे का कोणी?"
advertisement
4/8
सुरुवातीला लोकांना वाटलं की हा खरंच एखादा वैतागलेला तरुण असेल, पण जेव्हा पोस्टरवरच्या मजकुराकडे नीट लक्ष गेलं, तेव्हा खरा ट्विस्ट समोर आला. या पोस्टरवर 'स्टार प्रवाह' वाहिनीचा लोगो झळकतोय. त्यामुळे हा कोणताही सिरियस मॅट्रिमोनी शोध नसून एका नव्या मालिकेचा जबरदस्त प्रमोशन फंडा असल्याचं आता स्पष्ट झालं आहे.
advertisement
5/8
सोशल मीडियावर हा व्हिडिओ स्टार प्रवाहच्या अधिकृत अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, वाहिनीवर लवकरच 'बाई तुझा आशीर्वाद' नावाची एक नवी कोरी मालिका भेटीला येत आहे. या मालिकेतील मुख्य नायक 'धनराज' नेमका असाच काहीसा हटके आहे, जो आपल्या आयुष्याच्या जोडीदारासाठी संपूर्ण मुंबई पालथी घालत आहे.
advertisement
6/8
मुंबईच्या दादर, कुर्ला आणि अंधेरी सारख्या गजबजलेल्या भागात जेव्हा हा अभिनेता पोस्टर घेऊन उभा राहिला, तेव्हा त्याला पाहण्यासाठी लोकांची मोठी गर्दी जमली होती. अनेकांनी त्याच्यासोबत सेल्फी काढले, तर काहींनी मजेशीर सल्लेही दिले.
advertisement
7/8
मराठी मालिका विश्वात गेल्या काही दिवसांपासून प्रमोशन्सचे नवनवीन प्रकार पाहायला मिळत आहेत. पण अशा प्रकारे रस्त्यावर उतरून बायको शोधणं ही कल्पना प्रेक्षकांना चांगलीच भावली आहे.
advertisement
8/8
धनराजला त्याची अपेक्षित बायको सापडेल का? या मालिकेची कथा नेमकी काय असेल? हा नवीन अभिनेता नेमका कोण आहे? या सर्व प्रश्नांची उत्तरं लवकरच स्टार प्रवाहच्या पडद्यावर मिळतील. पण सध्या तरी, मुंबईच्या उन्हात 'बायको पाहिजे' म्हणणाऱ्या या धनराजने सोशल मीडियाचा पारा मात्र नक्कीच चढवला आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
'कुणी बायको देता का बायको?' मुंबईच्या रस्त्यांवर फिरणारा 'हा' व्हायरल पोस्टर बॉय आहे तरी कोण? समोर आलं मोठं सरप्राइज