BBM5 captainancy : अंकिता, जान्हवी की सूरज? सदस्य कॅप्टन निवडण्यात फेल; आता तुम्हीच सांगा नाव
- Published by:Minal Gurav
Last Updated:
बिग बॉस मराठीच्या घरात पाचव्या आठवड्याचा कॅप्टन निवडण्यात घरातील सदस्य फेल झाले आहेत. पण प्रेक्षकांना कोणता सदस्य कॅप्टन व्हावा असं वाटतंय?
advertisement
1/7

'बिग बॉस मराठी'चा पाचवा सीझन सुरू होऊन आता पाच आठवडे सुरू झाले आहेत. पाच आठवड्यात फक्त तीन जण कॅप्टन होऊ शकले. पहिल्या आठवड्यात कॅप्टन्सी हातातून गेली.
advertisement
2/7
दुसऱ्या आठवड्यात अंकिता वालावलकर कॅप्टन झाली. त्यानंतर तिसऱ्या आठवड्यात अरबाज कॅप्टन झाला आणि चौथ्या आठवड्यात अरबाजने कॅप्टन्सी निक्कीला दिली. आता पाचव्या आठवड्याचा कॅप्टन कोण होणार यासाठी चुरस पाहायला मिळणार आहे.
advertisement
3/7
'बिग बॉस मराठी'चा प्रोमो समोर आला आहे. या प्रोमोमध्ये 'बिग बॉस मराठी'च्या घरातील सदस्य कॅप्टनसी टास्क खेळताना दिसत आहेत. प्रोमोमध्ये बिग बॉस म्हणत आहेत,"आता वेळ आहे नवा कॅप्टन निवडण्याची".
advertisement
4/7
त्यानंतर टीम बी मधील सदस्य जिंकल्याने त्यांना त्यांच्यात कॅप्टन निवडण्याची संधी देतात. घरातील इतर सदस्य कॅप्टन होण्यासाठी जान्हवी, अंकिता आणि सूरज यांचं नाव घेतात.
advertisement
5/7
जान्हवी, अंकिता आणि सूरज हे कॅप्टन पदासाठी का योग्य आहेत हे सांगताना दिसत आहेत. पण या तिघांच्या नावावर कोणाचंही बहुमत होत नाही.
advertisement
6/7
टीम बीमधील सदस्य कॅप्टन निवडण्यास असमर्थ राहिल्याने बिग बॉस बाहेर बसलेल्या सदस्यांना नवा कॅप्टन निवडण्यास सांगतात. निक्की, अभिजीत, पंढरीनाथ, घन:श्याम आता नवा कॅप्टन निवडणार आहेत.
advertisement
7/7
बिग बॉसच्या या प्रोमोवर प्रेक्षकांनी मात्र सूरज चव्हाण कॅप्टन झाला पाहिजे असं म्हटलं आहे. सुरज ला करा.. सुरज best आहे, अशा प्रतिक्रिया प्रेक्षकांकडून येत आहेत.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
BBM5 captainancy : अंकिता, जान्हवी की सूरज? सदस्य कॅप्टन निवडण्यात फेल; आता तुम्हीच सांगा नाव