'मी मुस्लिम असल्यामुळे मला...', जावेद अख्तर यांनी सांगितला 25 वर्षांपूर्वीचा तो किस्सा! ऐकून तुम्हालाही राग येईल
- Published by:Pratiksha Pednekar
Last Updated:
Javed Akhtar : जावेद अख्तर यांनी २५ वर्षांपूर्वी त्यांना मुंबईत घर घेताना जो अनुभव आला त्याबाबत भाष्य केले आहे. हा किस्सा ऐकून तुम्हीही भावूक व्हाल.
advertisement
1/7

काही काळापूर्वी पाकिस्तानी अभिनेत्री बुशरा अंसारी हिने गीतकार-दिग्दर्शक जावेद अख्तर यांच्यावर एक वादग्रस्त कमेंट केली होती. मुंबईत जावेद अख्तर यांना भाड्याने घरही मिळत नाही, असं तिने म्हटलं होतं. यावर आता जावेद अख्तर यांनी एका मुलाखतीत जोरदार पलटवार केला आहे.
advertisement
2/7
खरं तर, काही महिन्यांपूर्वी पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याचा जावेद अख्तर यांनी तीव्र शब्दांत निषेध केला होता आणि पाकिस्तानविरोधात कठोर कारवाईची मागणी केली होती. त्यांच्या या वक्तव्यावर बुशरा अंसारी भडकल्या होत्या आणि त्यांनी जावेद अख्तर यांच्यावर ही वैयक्तिक टिप्पणी केली होती.
advertisement
3/7
याबद्दल आता जावेद अख्तर यांनी रोखठोक उत्तर दिले आहे. जावेद अख्तर यांनी 'द लल्लनटॉप' (The Lallantop) ला दिलेल्या मुलाखतीत सुरुवातीलाच बुशरा अंसारीला प्रश्न विचारला, "तुम्ही कोण आहात मला हे सांगणारे की मी कधी बोलायला पाहिजे आणि कधी नाही?" जावेद अख्तर पुढे म्हणाले, "एक पाकिस्तानी अभिनेत्री आहे बुशरा अंसारी. ती नेहमी माझ्याबद्दल बोलत असते. एकदा तिने मला गप्प बसण्याचा सल्ला दिला होता. तिने काहीतरी असं म्हटलं होतं की, नसीरुद्दीन शाह गप्प राहतात, तुम्हीही गप्प राहायला पाहिजे."
advertisement
4/7
जावेद अख्तर यांनी बुशरा अंसारीवर निशाणा साधत म्हटलं, "माझा त्यांना प्रश्न आहे, त्या कोण असतात मला हे सांगणारे की मी कधी बोलायला पाहिजे आणि कधी नाही? तुम्हाला हा अधिकार कोणी दिला आणि तुम्ही माझ्याकडून ही अपेक्षा का करता की मी तुमचा सल्ला मानावा? आमच्या देशात, भारतात अनेक समस्या असू शकतात, पण जर कोणताही बाहेरचा व्यक्ती टिप्पणी करायला येत असेल, तर मी एक भारतीय आहे. हे ते का विसरतात? मी गप्प राहणार नाही."
advertisement
5/7
जेव्हा मुलाखतकाराने जावेद अख्तर यांना विचारलं की, बुशरा अंसारीने दावा केला आहे की तुम्हाला मुंबईत भाड्याने घरही मिळत नाही, तेव्हा जावेद अख्तर यांनी उपरोधिकपणे उत्तर दिले, "हो, ठीक आहे, शबाना आझमी आणि मी रस्त्यावर झोपतोय. काय यार, आता काय बोलावं?"
advertisement
6/7
यानंतर जावेद अख्तर यांनी त्या घटनेचा उल्लेख केला, ज्यामुळे बुशरा अंसारीने त्यांच्यावर 'भाड्याने घर न मिळण्या'ची टिप्पणी केली होती. ते म्हणाले, "सुमारे २५ वर्षांपूर्वी शबानाला गुंतवणुकीच्या उद्देशाने एक फ्लॅट खरेदी करायचा होता. पण ब्रोकरने सांगितले की मालक आपले घर कोणत्याही मुस्लिमाला विकणार नाही. पण, तुम्हाला माहीत आहे का त्याने खरंच का नकार दिला? त्याने यासाठी नकार दिला कारण त्याचे आई-वडील सिंधमध्ये राहायचे, जिथून या पाकिस्तान्यांनी त्यांना हाकलून दिले होते."
advertisement
7/7
"इतका मोठा आणि खोलवर घाव झाल्यावर कोणताही व्यक्ती मालकासारखंच रिअॅक्ट करेल. जर त्या दिवशी शबानाला फ्लॅट देण्यास नकार दिला असेल, तर त्याचे कारण ती मुस्लिम होती हे नव्हते, तर त्याचे कारण असे होते की, मालकाला आपल्या आई-वडिलांसोबत जे काही घडले, त्याचा बदला कुठेतरी घ्यायचा होता. तर ती बुशरा अंसारी कोण आहे यावर बोलणारी आणि मला गप्प राहण्यासाठी सांगणारी? त्यांना टिप्पणी करण्यापूर्वी स्वतःच्या आत डोकावून पाहिले पाहिजे." जावेद अख्तर यांनी बुशरा अंसारीला ठणकावून सांगितले.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
'मी मुस्लिम असल्यामुळे मला...', जावेद अख्तर यांनी सांगितला 25 वर्षांपूर्वीचा तो किस्सा! ऐकून तुम्हालाही राग येईल