TRENDING:

महिलांच्या त्वचेचे मास्क, हाडांचं फर्निचर अन् कवटीची... सीरिअल किलरचं किळसवाणं कृत्य पाहून उडेल थरकाप

Last Updated:
OTT Crime Thriller series : एक भयानक सत्यकथा सध्या पडद्यावर आली आहे. ही कहाणी आहे १९५० च्या दशकातील एका 'कसाई' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मारेकऱ्याची, ज्याची क्रूरता ऐकून तुमचा थरकाप उडेल.
advertisement
1/8
त्वचेचे मास्क, हाडांचं फर्निचर... सीरिअल किलरचं किळसवाणं कृत्य पाहून उडेल थरकाप
मुंबई : लहानपणापासून आपल्याला भीतीदायक गोष्टी आणि रहस्यमय कथा नेहमीच आकर्षित करत आल्या आहेत. भूत-राक्षसांच्या लोककथा असोत किंवा मग खऱ्या खुन्यांच्या थरारक कहाण्या.
advertisement
2/8
याच थरारावर आधारलेली एक भयानक सत्यकथा सध्या पडद्यावर आली आहे. ही कहाणी आहे १९५० च्या दशकातील एका 'कसाई' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मारेकऱ्याची, ज्याची क्रूरता ऐकून तुमचा थरकाप उडेल.
advertisement
3/8
सध्याच्या काळात चित्रपट आणि मालिकांमध्ये खऱ्या गुन्हेगारी घटनांवर आधारित कथांना खूप मागणी आहे. याच पठडीतील नेटफ्लिक्सची गाजलेली सीरिज 'मॉन्स्टर' चं तिसरं सीझन नुकतंच प्रदर्शित झालं आहे.
advertisement
4/8
'मॉन्स्टर: द एड गीन स्टोरी' या नावाने हा तिसरा भाग ३ ऑक्टोबर २०२५ रोजी नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाला. लेखक आणि निर्माते रायन मर्फी आणि इयान ब्रेनन यांनी या ८ एपिसोडच्या सीरिजमधून ही भयाण कहाणी पुन्हा एकदा लोकांसमोर आणली आहे. ५० ते ६० मिनिटांचे हे एपिसोड हिंदी भाषेतही उपलब्ध आहेत आणि रिलीजनंतर ही सीरिज ओटीटीवर चर्चेत आहे.
advertisement
5/8
या सीरिजमध्ये अभिनेता चार्ली हनम याने क्रूर मारेकरी एड गीन याची भूमिका साकारली आहे. एड गीन हा विस्कॉन्सिनमधील एक सिरीयल किलर होता.
advertisement
6/8
एड गीनच्या विकृत आणि किळसवाण्या कृत्यांनी देशाला हादरवून सोडले होते. तो महिलांच्या मृतदेहांशी अमानुष आणि क्रूर कृत्य करायचा. त्याने दोन महिलांची हत्या केली, तर अनेक मृतदेह चक्क कब्रस्थानातून काढून आणले.
advertisement
7/8
त्यांच्या त्वचेपासून मुखवटे, हाडांपासून फर्निचर आणि कवटीचा उपयोग कटोरी बनवण्यासाठी करायचा. त्याची आई ऑगस्टा हिचा त्याच्यावर असलेला कठोर पगडा आणि त्याचे भयानक आयुष्य यात दाखवण्यात आले आहे.
advertisement
8/8
या मालिकेची ही सत्य कथा यापूर्वीही 'सायको' आणि 'द सायलेन्स ऑफ द लॅम्ब्स' यांसारख्या गाजलेल्या चित्रपटांना प्रेरणा देऊन गेली आहे. IMDb वर या सीरिजला सध्या 7.2/10 इतकी चांगली रेटिंग मिळाली आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
महिलांच्या त्वचेचे मास्क, हाडांचं फर्निचर अन् कवटीची... सीरिअल किलरचं किळसवाणं कृत्य पाहून उडेल थरकाप
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल