TRENDING:

भारती सिंहच्या घरी ज्युनियर गोलाची एन्ट्री, वयाच्या 41 व्या वर्षी दुसऱ्यांदा आई झाली कॉमेडी क्वीन

Last Updated:
Bharti Singh : भारती सिंह दुसऱ्यांदा आई झाली असून तिने एका मुलाला जन्म दिला आहे. भारती आणि हर्षवर सध्या चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
advertisement
1/7
भारती सिंहच्या घरी ज्युनियर गोलाची एन्ट्री, दुसऱ्यांदा आई झाली कॉमेडी क्वीन
 सि कॉमेडियन भारती सिंह दुसऱ्यांदा आई झाली आहे. वयाच्या 41 व्या वर्षी तिने एका मुलाला जन्म दिला आहे. भारती आणि हर्ष लिम्बाचियावर सध्या चाहत्यांकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
advertisement
2/7
भारती सिंह सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांसोबत हेल्थ अपडेट शेअर करत होती. आधी एक मुलगा असल्याने दुसरी मुलगी व्हावी, अशी भारती आणि हर्ष यांची इच्छा होती. पण त्यांच्या घरी आता चिमुकल्याचे आगमन झाले आहे.
advertisement
3/7
भारती सिंह कधी गुडन्यूज देणार याकडे चाहत्यांचं लक्ष लागलं होतं. अखेर 19 डिसेंबर 2025 रोजी भारती आणि हर्ष यांनी आपल्या लाडक्या चाहत्यांना गुडन्यूज दिली आहे. सेलिब्रिटींसह चाहत्यांकडून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
advertisement
4/7
भारती सिंह प्रेग्नंसीमध्ये खूप काम करत होती. पहिल्या प्रेग्नंसीदरम्यानही ती शेवटपर्यंत सक्रीय होती. आता दुसऱ्या प्रेग्नंसीदरम्यान भारती सिंह 'लाफ्टर शेफ'च्या तिसऱ्या सीझनचं शूटिंग करत होती. या शोमधील कलाकारांनी काही दिवसांपूर्वी तिच्यासाठी खास सरप्राईज बेबी शॉवरचं प्लॅनिंग केलं होतं.
advertisement
5/7
छोट्या पडद्यावरील लोकप्रिय जोड्यांपैकी भारती सिंह आणि हर्ष लिम्बाचिया यांचा समावेश आहे. त्यांचा पहिला मुलगा 'गोला' हादेखील सोशल मीडियावर खूप फेमस आहे.
advertisement
6/7
भारती सिंह आणि हर्ष लिम्बाचिया 2017 मध्ये विवाहबंधनात अडकले. त्यानंतर 2022 मध्ये भारतीने गोलाला जन्म दिला. गोलाचं खरं नाव 'लक्ष्य' असं आहे.
advertisement
7/7
भारती सिंह आणि हर्ष लिम्बाचिया यांना मुलगी व्हायला हवी होती, अशा कमेंट्स आता नेटकऱ्यांकडून येत आहेत. भारती किंवा हर्ष यांनी अद्याप मुलगा किंवा मुलगी झाल्याची माहिती अधिकृतरित्या शेअर केलेली नाही.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
भारती सिंहच्या घरी ज्युनियर गोलाची एन्ट्री, वयाच्या 41 व्या वर्षी दुसऱ्यांदा आई झाली कॉमेडी क्वीन
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल