Yashaswi Jaiswal : अचानक हॉस्पिटलमध्ये भरती, वजन कमी झालं; जयस्वालने स्वत: दिली प्रकृतीची अपडेट! म्हणाला...
- Published by:Saurabh Talekar
Last Updated:
Yashaswi Jaiswal Health Update : भारतीय क्रिकेट संघाचा स्टार सलामीवीर यशस्वी जयस्वालच्या चाहत्यांसाठी एक वाईट बातमी आहे. आयपीएल 2026 च्या मिनी लिलावाच्या दिवशीच त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं.
advertisement
1/5

सय्यद मुश्ताक अली खेळताना यशस्वी जयस्वाल याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं., दोन दिवसांपूर्वी त्याला तीव्र गॅस्ट्रोएन्टेरिटिसचे निदान झालं होतं. अशातच आता यशस्वी जयस्वाल याने स्वत: तब्येतीची माहिती दिलीये.
advertisement
2/5
यशस्वी जयस्वाल याने चाहत्यांनी दिलेल्या शुभेच्छांबद्दल सर्वांचे मनापासून आभार मानले आहेत. ट्विट करत त्याने म्हटलं आहे की, कठीण काळात मिळालेले हे प्रेम त्याच्यासाठी खूप मोलाचे आहे.
advertisement
3/5
गेल्या काही दिवसांपासून सातत्याने विचारपूस करणाऱ्या चाहत्यांमुळे त्याला मोठा मानसिक आधार मिळाला असून, सध्या तो या शुभेच्छांमुळे अत्यंत भारावून गेला असल्याचे त्याच्या शब्दांतून जाणवत आहे.
advertisement
4/5
आपल्या प्रकृतीबाबत अपडेट देताना यशस्वीने सांगितले की, त्याच्यावर सध्या उपचार सुरू असून तो वेगाने बरा होत आहे. त्याला मिळत असलेल्या उत्कृष्ट वैद्यकीय सुविधेबद्दल आणि डॉक्टरांच्या टीमबद्दल त्याने कृतज्ञता व्यक्त केली.
advertisement
5/5
रिकव्हरीचा वेग चांगला असल्याने तो लवकरच पूर्णपणे फिट होऊन पुन्हा एकदा टीम इंडियासाठी मैदानात उतरण्यास सज्ज होत आहे, असे संकेत यशस्वी जयस्वाल याने दिले आहेत.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/स्पोर्ट्स/
Yashaswi Jaiswal : अचानक हॉस्पिटलमध्ये भरती, वजन कमी झालं; जयस्वालने स्वत: दिली प्रकृतीची अपडेट! म्हणाला...