प्रेग्नेंट आईला छळलं, वडिलांना फसवलं; अमालच्या पालकांनी भोगाले अपार कष्ट, अनु मलिकवर केले गंभीर आरोप
- Published by:Pratiksha Pednekar
Last Updated:
बिग बॉस १९मध्ये अमाल मलिकने आईच्या संघर्षाची आणि अनु मलिकने वडिलांच्या गाण्याचा श्रेय न दिल्याची भावनिक कहाणी शेअर केली, ज्याची सर्वत्र चर्चा सुरू आहे.
advertisement
1/7

मुंबई: ‘बिग बॉस १९’चा खेळ आता खूपच रंजक होत आहे. घरात रोज नवा ड्रामा आणि वाद पाहायला मिळतात. पण, काही वेळा स्पर्धक त्यांच्या आयुष्यातील काही भावनिक गोष्टीही शेअर करतात, ज्यामुळे सगळ्यांचे डोळे पाणावतात. आता संगीतकार अमाल मलिकने त्याची आई गरोदर असताना तिला किती त्रास झाला, याबद्दल एक मोठा खुलासा केला आहे.
advertisement
2/7
नुकत्याच प्रदर्शित झालेल्या एका एपिसोडमध्ये अमाल मलिक अभिनेता बसीर अलीसोबत बोलताना दिसला. यावेळी त्याने त्याच्या आईच्या संघर्षाबद्दल सांगितलं. तो म्हणाला की, जेव्हा त्याची आई गरोदर होती, तेव्हा तिला खूप काही सहन करावं लागलं होतं.
advertisement
3/7
अमाल म्हणाला, “आम्ही एका संयुक्त कुटुंबात राहायचो. जेव्हा आई गरोदर होती, तेव्हा तिला खूप काही ऐकावं लागलं होतं.”
advertisement
4/7
तो पुढे म्हणाला, “एक दिवस आईला इतका राग आला की, तिने आपला हात कपाटावर मारून घेतला होता. माझ्या आईने इतकं सगळं सहन केलं, म्हणूनच आम्ही सगळे इथे आहोत.”
advertisement
5/7
अमालने त्याचे काका, प्रसिद्ध संगीतकार अनु मलिकवरही काही गंभीर आरोप लावले आहेत. तो म्हणाला की, अनु मलिकने त्याच्या वडिलांच्या गाण्याचा वापर केला, पण त्यांना कोणतंही श्रेय दिलं नाही.
advertisement
6/7
अमाल म्हणाला की, त्याने त्याच्या वडिलांना खूप असहाय्य परिस्थितीत पाहिलं आहे. त्याने एक किस्सा सांगितला की, एकदा त्याच्या वडिलांना एक गाणं रेकॉर्ड करण्यासाठी स्टुडिओमध्ये बोलावलं होतं. काही दिवसांनंतर, त्यांनी तेच गाणं गायक उदित नारायणच्या आवाजात ऐकलं.
advertisement
7/7
अमाल म्हणाला, “माझ्या वडिलांना असं वाटलं की, त्यांना संधी दिली जात आहे. पण, त्यांच्या गाण्याचा उपयोग केला गेला आणि त्यात उदित नारायणचा आवाज टाकण्यात आला.” अमालने केलेले हे दावे खूपच धक्कादायक आहेत आणि त्यामुळे आता बाहेरच्या जगातही याची चर्चा सुरू झाली आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
प्रेग्नेंट आईला छळलं, वडिलांना फसवलं; अमालच्या पालकांनी भोगाले अपार कष्ट, अनु मलिकवर केले गंभीर आरोप