TRENDING:

प्रणित मोरेला 'गाव चले जा' म्हणणाराच Bigg Boss 19 च्या घराबाहेर, या स्पर्धकालाही दाखवला बाहेरचा रस्ता

Last Updated:
Bigg Boss 19 : 'बिग बॉस 19'चा या आठवड्यात दोन स्पर्धकांचा प्रवास संपला आहे. त्यामुळे चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. दुसरीकडे या आठवड्यात सलमान खानने स्पर्धकांची चांगलीच शाळा घेतली आहे.
advertisement
1/7
प्रणित मोरेला 'गाव चले जा' म्हणणाराच Bigg Boss 19 च्या घराबाहेर
'बिग बॉस 19' हा छोट्या पडद्यावरील वादग्रस्त लोकप्रिय कार्यक्रम सध्या चांगलाच चर्चेत आहे. या आठवड्यात 'वीकेंड का वार'मध्ये सलमान खानने स्पर्धकांची चांगलीच शाळा घेतली. या आठवड्यात प्रणित मोरे, नेहल चुडासमा, बसीर अली आणि गौरव खन्ना हे चार सदस्य नॉमिनेट झाले होते. अशातच बिग बॉसने डबल एविक्शन करत चाहत्यांना मोठा धक्का दिला आहे.
advertisement
2/7
'बिग बॉस 19'ने या आठवड्यात दोन स्पर्धकांना घराबाहेरचा रस्ता दाखवला आहे. यात बसीर अली आणि नेहल चुडासमा या दोन स्पर्धकांचा समावेश आहे.
advertisement
3/7
काही दिवसांपूर्वीच प्रणित मोरे आणि बसीर अली यांच्यात वाद झालेला पाहायला मिळाला होता. बसीरने मराळमोळ्या प्रणितला 'गावी निघून जा' म्हणत डिवचलं होतं. त्यानंतर प्रणितने बसीरला चांगलच सुनावलं होतं. प्रणित म्हणाला होता,"हा महाराष्ट्र आहे आणि हा संपूर्ण महाराष्ट्र माझं गाव आहे. त्यामुळे तू इथून जा. चड्डीत राहा आणि निघ चल".
advertisement
4/7
बसीर अली आणि नेहल चुडासमा 'बिग बॉस 19'च्या घरातून बाहेर पडल्याने चाहत्यांसह घरातील सदस्यांनाही मोठा धक्का बसला आहे.
advertisement
5/7
बसीर बाहेर पडल्याने नेटकरी चांगलेच संतापले आहे. बसीरला नेहल आणि आमलने बर्बाद केलंय. सुरुवातीला तो चांगला खेळत होता, बसीरच्या घराबाहेर जाण्याचं खूप वाईट वाटतंय, बसीर टॉप 3 मध्ये तरी हवा होता, अशा कमेंट्स करत नेटकरी बसीरचं समर्थन करताना दिसत आहेत. सोशल मीडियावर #BringBackBaseer ट्रेंड करत आहे.
advertisement
6/7
'बिग बॉस 19'च्या आगामी भागात सलमान खानने नीलम गिरीची शाळा घेतली. तर घरातील सर्व सदस्य तान्या मित्तलच्या विरोधात उभे राहिले होते.
advertisement
7/7
'बिग बॉस 19' हा बहुचर्चित कार्यक्रम लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. 7 डिसेंबर 2025 रोजी या कार्यक्रमाचा दिमाखदार ग्रँड फिनाले पार पडणार आहे. त्यामुळे 'बिग बॉस 19'ची ट्रॉफी कोणाला मिळणार याकडे चाहत्यांचं लक्ष लागलं आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
प्रणित मोरेला 'गाव चले जा' म्हणणाराच Bigg Boss 19 च्या घराबाहेर, या स्पर्धकालाही दाखवला बाहेरचा रस्ता
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल