Pranit More : डेंग्यूमुळे प्रणित मोरे Bigg Boss 19 च्या घरातून OUT, बिग बॉसने त्याला किती पैसे दिले?
- Published by:Minal Gurav
Last Updated:
Bigg Boss 19 Contestants Salary : स्टँडअप कॉमेडियन प्रणित मोरे बिग बॉस 19 च्या घरातून आऊट झाला आहे. घराबाहेर आलेल्या प्रणित मोरेला बिग बॉसने किती पैसे असावेत असा प्रश्न त्याच्या चाहत्यांना पडला आहे. प्रणित मोरेसह घरातील इतर सदस्यांनाही किती पैसे देण्यात आले याची लिस्ट.
advertisement
1/7

बिग बॉस 19 लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. हा सीझन अखेरच्या टप्प्यात आहे. मराठमोळा स्टँडअप कॉमेडियन प्रणीत मोरे बिग बॉसच्या घरात होता. त्याने पहिल्या दिवसापासून उत्तम खेळ खेळला.
advertisement
2/7
70 दिवस तो बिग बॉसच्या घरात होता. अनेक स्पर्धकांना तो पुरुन उरला. पण त्याला डेंग्यू झाल्याने घरातून एक्झिट घ्यावी लागली. प्रणीत मोरे बिग बॉस 19च्या घरातून बाहेर आल्यानंतर त्याला किती पैसे मिळाले याची चर्चा सध्या सर्वत्र होतेय. प्रणीत मोरेसह घरातील इतर स्पर्धकांनाही किती पैसे मिळत आहेत हे पाहूयात.
advertisement
3/7
अनुपमा फेम अभिनेता गौरव खन्ना बिग बॉसच्या घरात जाण्याआधी सेलिब्रेटी मास्टर शेफ जिंकला होता. गौरव खन्नाला दर आठवड्याला 17.5 लाख रुपये मिळतात अशी माहिती आहे.
advertisement
4/7
अरमान मलिकचा भाऊ अमाल मलिकला दर आठवड्याला 8.75 लाख रुपये मिळतात. तर नगमा मिरजकर हिला दर आठवड्याला 5-8 लाख रुपये मिळतात अशी माहिती आहे.
advertisement
5/7
अश्नूर कौर आणि आवाज दरबार 6 लाख रुपये, तर अभिषेक बजाज, बसीर अली, तान्या मित्तल यांना दर आठवड्याला 3-6 लाख रुपये देण्यात आलेत. तर जयशान कादरीला दर आठवड्याला 2-5 लाख रुपये.
advertisement
6/7
फरहाना भट्ट, कुनिका सदानंद दर आठवड्याला 2-4 लाख रुपये मिळाले. नेहलला दर आठवड्याला 2-3 लाख रुपये देण्यात आलेत. तर नीलमला दर आठवड्याला 1-2 लाख रुपये मानधन देण्यात आलं आहे.
advertisement
7/7
अनेक मीडिया रिपोर्ट्सनुसार, प्रणित मोरे आणि मृदुल तिवारी यांना या सीझनमध्ये सर्वात कमी पैसे देण्यात आल्याची माहिती आहे. लवकरच याबाबत अपडेट समोर येईल असं म्हटलं जात आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
Pranit More : डेंग्यूमुळे प्रणित मोरे Bigg Boss 19 च्या घरातून OUT, बिग बॉसने त्याला किती पैसे दिले?