'प्रत्येक जन्मी तुझाच...' BIGG BOSS 19 फेम अमाल मलिकवर कोसळला दुःखाचा डोंगर, लाडक्या फॅमिली मेंबरचं निधन
- Published by:Pratiksha Pednekar
Last Updated:
प्रसिद्ध संगीतकार आणि गायक अमाल मलिक सध्या एका अत्यंत कठीण प्रसंगातून जातोय. नुकताच 'बिग बॉस १९' च्या घरातून बाहेर पडलेला अमाल एका मोठ्या दुःखात बुडाला आहे.
advertisement
1/8

मुंबई: प्रसिद्ध संगीतकार आणि गायक अमाल मलिक सध्या एका अत्यंत कठीण प्रसंगातून जातोय. नुकताच 'बिग बॉस १९' च्या घरातून बाहेर पडलेला अमाल एका मोठ्या दुःखात बुडाला आहे.
advertisement
2/8
अमालचा जीवापाड लाडका पाळीव कुत्रा 'हँडसम' याने जगाचा निरोप घेतला आहे. आपल्या लाडक्या 'चौ-चौ' (Chow Chow) जातीच्या श्वानाच्या निधनाने अमाल पूर्णपणे कोलमडला असून त्याने सोशल मीडियावर शेअर केलेली पोस्ट पाहून चाहत्यांचेही डोळे पाणावले आहेत.
advertisement
3/8
अमालने इन्स्टाग्रामवर हँडसमसोबतचा एक अतिशय गोंडस फोटो शेअर केला आहे. या फोटोत अमाल ब्लॅक सूटमध्ये दिसत असून त्याने हँडसमच्या डोक्यावर मायेने पापा घेतला आहे. हँडसमने देखील रेड कलरचा बो टाय लावून आपला रुबाब दाखवला आहे.
advertisement
4/8
हा फोटो शेअर करताना अमालने लिहिलंय, "मला आशा आहे की तू मला प्रत्येक जन्मात तुझा भाऊ होण्याची संधी देशील. #RestInPower #HandsomeMalik." प्राण्यांवर मनापासून प्रेम करणाऱ्या अमालसाठी हँडसम हा केवळ एक कुत्रा नव्हता, तर तो त्याच्या कुटुंबाचा अविभाज्य भाग होता.
advertisement
5/8
अमाल मलिक नुकताच चर्चेत होता तो म्हणजे 'बिग बॉस १९' मुळे. २४ ऑगस्ट २०२५ रोजी सुरू झालेल्या या वादग्रस्त शोमध्ये अमालने आपल्या स्वभावाने प्रेक्षकांची मनं जिंकली.
advertisement
6/8
तो या सीझनच्या टॉप ५ फायनलिस्टमध्ये पोहोचला होता. या पर्वाचे विजेतेपद अभिनेता गौरव खन्ना याने पटकावलं, तर अमालसोबत प्रणीत मोरे, फरहाना भट्ट आणि तान्या मित्तल यांनी अंतिम फेरीत मजल मारली होती.
advertisement
7/8
डब्बू मलिक आणि ज्योती मलिक यांचा थोरला मुलगा, तसेच गायक अरमान मलिकचा मोठा भाऊ असलेला अमाल हा बॉलिवूडमधील एक दिग्गज संगीतकार आहे.
advertisement
8/8
त्याने २०१४ मध्ये सलमान खानच्या 'जय हो' चित्रपटातून पदार्पण केलं होतं. मात्र, खऱ्या अर्थाने त्याला ओळख मिळाली ती 'एम.एस. धोनी: द अनटोल्ड स्टोरी' या चित्रपटातील सुपरहिट गाण्यांमुळे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
'प्रत्येक जन्मी तुझाच...' BIGG BOSS 19 फेम अमाल मलिकवर कोसळला दुःखाचा डोंगर, लाडक्या फॅमिली मेंबरचं निधन