Bigg Boss 19 : 'माझ्या गर्लफ्रेंड होत्या तेव्हा आईचे बॉयफ्रेंड होते'; हिरोईनच्या मुलाचा शॉकिंग खुलासा
- Published by:Minal Gurav
Last Updated:
Kunika Sadanand Relationship with Kumar Sanu : गायक कुमार सानू यांच्या अफेअर्सच्या स्टोरी बॉलिवूडमध्ये तुफान हिट आहेत. बिग बॉस 19मधील एका अभिनेत्रीचं देखील कुमार सानूसोबत अफेअर असल्याचं तिनेच सांगितलं. त्यानंतर आता तिच्या मुलाची रिअँक्शन समोर आली आहे.
advertisement
1/8

90च्या दशकातील प्रसिद्ध अभिनेत्री कुनिका सदानंद19मध्ये चांगलीच चर्चेत आली आहे. बिग बॉसच्या घरात तिच्या अफेअर्सची चर्चा रंगली आहे. घराबाहेरही कुनिकाच्या अफेअर्सबद्दल अनेक लोक बोलत आहेत.
advertisement
2/8
दरम्यान तिच्या अफेअर्सबाबत तिच्या 27 वर्षीय मुलानेच खुलासा केला आहे. माझ्या गर्लफ्रेंड होत्या तेव्हा माझ्या आईचे बॉयफ्रेंड होते असं तो म्हणाला आहे. त्याचं हे वक्तव्य सध्या चर्चेत आलं आहे.
advertisement
3/8
सिद्धार्थ कन्ननला दिलेल्या मुलाखतीत कुनिकाचा मुलगा अयान म्हणाला की, "मी तिला दिवसभर घरी त्याची गाणी गाताना पाहिले. मी विनोद करत होतो. पण तिला तो एक गायक म्हणून खूप आवडतो. ती अजूनही त्याची गाणी गाते. लोक म्हणतात की हे प्रेम 27 वर्षे चाललं पण प्रत्यक्षात ती म्हणाली की जेव्हा ते घडले तेव्हा ती 27 वर्षांची होती."
advertisement
4/8
अयानने आई कुनिकाला तिच्या आणि कुमार सानू यांच्याबद्दल विचारलं तेव्हा ती त्याला म्हणाली होती की, "तो माझ्या आयुष्यात खूप महत्वाचा होता. मी त्याला माझा सोलमेट मानत होती. प्रत्येकाने आयुष्यात एकदा तरी अशा प्रकारचं प्रेम अनुभवलं पाहिजे. मी खूप विषारी होते. खूप, खूप विषारी."
advertisement
5/8
कुनिका सदानंदनने पुन्हा एकदा बिग बॉसच्या घरात तिच्या प्रेमाबद्दल सांगितले. तिने खुलासा केला की, कुमार सानू विवाहित होता आणि लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये असताना तो त्याच्या पत्नीपासून वेगळा झाला होता. त्यावेळी माझे लग्न झाले नव्हते. आम्ही एकत्र राहत होतो. पण नंतर त्याचे दुसऱ्या महिलेशी प्रेमसंबंध होते. त्याने मला फसवलं तेव्हा मी त्याला सोडून दिलं."
advertisement
6/8
कुनिका एका मुलाखतीत म्हणाली होती की, ती कुमार सानूच्या पत्नीसारखी होती आणि त्याला तिचा नवरा मानत होती. कुनिकाने सांगितलं "त्याच्या पत्नीने हॉकी स्टिकने माझी गाडी फोडली. ती माझ्या घराबाहेर येऊन ओरडायची. पण मी तिला समजून घेतलं. तिला तिच्या मुलांसाठी पैसे हवे होते आणि ती चुकीची नव्हती. तिने सांगितले की तिला कुमार सानू परत नकोय."
advertisement
7/8
अभिनेत्रीने उटीमध्ये गायकाशी झालेल्या तिच्या पहिल्या भेटीची आठवणही करून दिली. अभिनेत्री कामात बिझी असताना गायक त्याच्या बहिणी आणि पुतण्यासोबत सुट्टीसाठी उटीला आला होता. त्यांच्या पहिल्या भेटीनंतर दोघेही जवळचे मित्र बनले.
advertisement
8/8
तिने पुढे असंही सांगितलं की, त्यावेळी कुमार सानू त्याच्या वैयक्तिक आयुष्यात कठीण काळातून जात होता. त्याने हॉटेलच्या खिडकीतून उडी मारून आत्महत्या करण्याचा प्रयत्नही केला. अभिनेत्रीसह त्याच्या आजूबाजूच्या लोकांनी त्याला खिडकीच्या कड्यावरून खाली खेचले. जेव्हा तो त्याच्या वेदनांबद्दल बोलला तेव्हा तिने त्याला मिठी मारली. या घटनेने तिला आणि कुमार सानूला आणखी जवळ आणले.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
Bigg Boss 19 : 'माझ्या गर्लफ्रेंड होत्या तेव्हा आईचे बॉयफ्रेंड होते'; हिरोईनच्या मुलाचा शॉकिंग खुलासा