कायद्यानुसार कोर्टात दाद मागितली
सासूचा आरोप आहे की, सुनेने भांडणातून पती आणि तिला घरातून बाहेर काढले आहे आणि त्यांच्या मालकीचा बंगला स्वतःच्या ताब्यात घेतला आहे. या प्रकरणात सासूने घरगुती हिंसाचार कायद्यानुसार कोर्टात दाद मागितली आहे. हा खटला सुरू असतानाच, घटस्थापना जवळ आल्यामुळे सासूने कोर्टात एक अर्ज दाखल केला. अनेक वर्षांपासून तीच कुटुंबाच्या कुलदेवतांची पूजा करत आहे. त्यामुळे घटस्थापनेच्या पूजेसाठी तिला मूर्ती आणि टाक मिळावेत अशी मागणी तिने केली.
advertisement
मूर्ती आणि टाकांची पूजा
सासूच्या वकिलांनी कोर्टात सांगितले की, त्या गेली 40 वर्षे या मूर्ती आणि टाकांची पूजा करत आहेत. हा त्यांचा परंपरागत हक्क आहे. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून, प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी वाय. एस. कवडे यांनी सासूचा अर्ज मंजूर केला. कोर्टाने सुनेला तात्पुरत्या स्वरूपात देवाच्या मूर्ती आणि टाक सासूला देण्याचा आदेश दिला आहे. याशिवाय, कोर्टाने दोन्ही पक्षांना सासू आणि तिच्या पतीचे कपडे तसेच इतर सामान कसे परत करायचे, यावर एक योजना तयार करून कोर्टात सादर करण्याचे निर्देशही दिले आहेत.
सासूचा अर्ज मंजूर केला
दरम्यान, सुनेने पती व सासूला त्रास देऊन बंगल्याबाहेर काढले. मात्र, सासू मागील चाळीस वर्षांपासून घटस्थापना करीत असून, पूजा करीत आहेत. यंदाही त्यांना घटस्थापनेच्या पार्श्वभूमीवर देवाचे टाक आणि मूर्तीची पूजा करायची आहे, असे न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. न्यायालयाने दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून सासूचा अर्ज मंजूर केला, असं सासूच्या वकीलने सांगितलं आहे.