TRENDING:
500 रुपयांचा पहिला चेक ते बिग बॉस 19 ची Runner Up! काश्मिरच्या फरहाना भट्टने कमावला बक्कळ पैसा, एकूण संपत्ती किती माहितीए?
Last Updated:
Bigg Boss 19 Runner Up Farhana Bhatt: आपल्या स्पष्टवक्तेपणामुळे आणि घरात वादग्रस्त ठरूनही प्रेक्षकांची मते मिळवणाऱ्या फरहाना भट्टला दुसऱ्या स्थानावर समाधान मानावे लागले.
advertisement
1/11
काश्मिरच्या फरहाना भट्टने कमावला बक्कळ पैसा, एकूण संपत्ती किती माहितीए?
advertisement
2/11
दरम्यान, आपल्या स्पष्टवक्तेपणामुळे आणि घरात वादग्रस्त ठरूनही प्रेक्षकांची मते मिळवणाऱ्या फरहाना भट्टला दुसऱ्या स्थानावर समाधान मानावे लागले.
advertisement
3/11
घरात प्रचंड भांडखोर आणि स्पष्टवक्ती म्हणून ओळखली जाणारी फरहाना, शोमध्ये येण्यापूर्वी मात्र एका वेगळ्याच संघर्षातून गेली आहे. फरहानाचा जन्म १९९७ मध्ये श्रीनगरमधील एका रूढिवादी काश्मिरी मुस्लिम कुटुंबात झाला. तिच्या आयुष्यात संघर्ष जन्मण्याआधीच सुरू झाला होता.
advertisement
4/11
फरहानाच्या जन्माच्या केवळ तीन महिने आधीच तिच्या वडिलांनी तिला आणि आईला सोडून दिले होते. तिने वडिलांना फक्त फोटोंमध्येच पाहिले आहे.
advertisement
5/11
फरहानाच्या आईने तिला शिकवण्यासाठी आणि वाढवण्यासाठी खूप कष्ट घेतले. त्याकाळी तिची आई केवळ १२०० रुपये प्रति महिना पगारावर काम करत होत्या. या कमाईतून आईने फरहानाला मोठा आधार दिला.
advertisement
6/11
फरहानाला लहानपणापासूनच चित्रपट इंडस्ट्री आणि मॉडेलिंगमध्ये आवड होती. हीच आवड तिला मुंबईत घेऊन आली. तिचा पहिला पे चेक केवळ ५०० रुपयांचा होता. इतक्या कमी पैशात तिने स्वप्न पाहणे सोडले नाही.
advertisement
7/11
फरहाना जेव्हा अभिनयाच्या जगात काम करत असल्याचे तिच्या नातेवाईकांना कळले, तेव्हा त्यांनी याला जोरदार विरोध केला. त्यांनी थेट फरहानासमोर अट ठेवली की, एकतर तिने फिल्म इंडस्ट्री सोडावी, नाहीतर आईसोबत शहर सोडून जावे!
advertisement
8/11
समाज आणि नातेवाईकांशी दोन हात करत फरहानाने आपले स्वप्न कायम ठेवले. तिने इंडस्ट्रीत स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली. तिने संघर्ष करून 'लैला मजनू' आणि रोहित शेट्टीच्या 'सिंघम अगेन'सारख्या मोठ्या चित्रपटांमध्ये काम केले.
advertisement
9/11
'बिग बॉस १९' मध्ये येण्यापूर्वी तिचे सोशल मीडियावर फार कमी फॉलोअर्स होते. पण घरात तिचा स्पष्टवक्तेपणा लोकांना खूप आवडला. आज तिचे लाखो नाही, तर मिलियन्समध्ये फॉलोअर्स आहेत.
advertisement
10/11
वाढती प्रसिद्धी, लोकप्रियता आणि तिच्याकडे येणाऱ्या नवीन प्रोजेक्ट्समुळे, तिची अंदाजे एकूण संपत्ती सुमारे १.५-३ कोटींच्या घरात असल्याचे मानले जाते, असे अनेक अहवालांमध्ये सांगितले आहे.
advertisement
11/11
फरहाना ही बिग बॉस १९ मधील सर्वात कमी मानधन घेणाऱ्या स्पर्धकांपैकी एक आहे. तिला दर आठवड्याला २ लाख ते ४ लाख फी मिळत असल्याचा अंदाज आहे. याचाच अर्थ १४ आठवड्यांमध्ये तिने २८ लाख ते ५६ लाख इतके पैसे कमावले आहेत.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
500 रुपयांचा पहिला चेक ते बिग बॉस 19 ची Runner Up! काश्मिरच्या फरहाना भट्टने कमावला बक्कळ पैसा, एकूण संपत्ती किती माहितीए?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल