हिट वाढतेय! मराठी बिग बॉस गाजवणाऱ्या मराठमोळ्या अभिनेत्रीचा मालदिवमध्ये हॉट अंदाज, PHOTO
- Published by:Minal Gurav
Last Updated:
बिग बॉस मराठी 5 गाजवणारी मराठमोळी अभिनेत्री मालदिवमध्ये व्हेकेशन एन्जॉय करतेय. तिचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झालेत.
advertisement
1/9

मराठी बिग बॉस 5 गाजवणारी मराठी अभिनेत्री पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. तिच्या बोल्डनेस आणि हॉटनेससाठी ओळखली जाते. तिचे नवे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
advertisement
2/9
निक्की तांबोळी सध्या मालदिवमध्ये व्हेकेशन एन्जॉय करत आहे. या ट्रिपमधील तिचे फोटो सध्या सोशल मीडियावर शेअर केलेत. या फोटोंवर चाहत्यांच्या कमेंट्सचा पाऊस पडला आहे.
advertisement
3/9
निक्कीने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर बिकिनी लुकमधील काही फोटो शेअर केले आहेत. समुद्रकिनाऱ्यावर रिलॅक्स मूडमध्ये दिसणारी निक्की या फोटोंमध्ये खूपच ग्लॅमरस दिसत आहे.
advertisement
4/9
विशेष म्हणजे या फोटोंसोबत तिने दिलेलं कॅप्शन चर्चेत आलं आहे. निक्कीनं लिहिलंय, "हिट वाढतेय… आणि ती फक्त वेदरमुळेच नाही."
advertisement
5/9
निक्कीचे हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असून फॅन्स तिच्यावर कमेंट्सचा वर्षाव करत आहेत. 'ओप्स, आग लगा दी', 'हॉट', 'फायर' अशा कमेंट्ससोबत अनेकांनी हार्ट आणि फायर इमोजी शेअर करत चाहत्यांनी तिच्या लुकचं कौतुक केलं आहे.
advertisement
6/9
निक्की तांबोली यापूर्वीही तिच्या स्टाईल आणि बोल्ड फोटोशूटमुळे चर्चेत राहिली आहे. निक्की नुकतीच 'द 50' या शोमध्ये दिसली होती. या शोमध्येही निक्कीने तिचा दमदार परफॉर्मन्स दिला होता.
advertisement
7/9
सध्या मालदिवमध्ये निक्की तिचा व्हेकेशन मोड एन्जॉय करतेय. तर दुसरीकडे ग्लॅमरस अंदाजाने सोशल मीडियावर सगळ्यांचं लक्ष वेधून घेतेय.
advertisement
8/9
बिग बॉस मराठी 5 मध्ये असताना निक्की आणि अरबाज पटेल यांची केमिस्ट्री जुळली. ते अजूनही रिलेशनमध्ये आहेत. निक्कीच्या कुटुंबाकडून त्यांच्या लग्नाला परवानगी नाही असं निक्कीने द 50 मध्ये सांगितलं होतं.
advertisement
9/9
बिग बॉसच्या घरात निक्की आणि अरबाज यांची केमिस्ट्री खूप चर्चेत आली होती. बिग बॉसनंतर दोघे द 50 मध्येही कपल म्हणून गेले होते.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
हिट वाढतेय! मराठी बिग बॉस गाजवणाऱ्या मराठमोळ्या अभिनेत्रीचा मालदिवमध्ये हॉट अंदाज, PHOTO