TRENDING:

Pod Taxi : कुर्ला ते वांद्रे अवघ्या काही मिनिटांत! प्रवासाचा वेळ वाचणार, कोणती असतील स्थानकं?

Last Updated:
BKC Pod Taxi : बीकेसीतील वाहतूक कोंडीवर उपाय म्हणून पॉड टॅक्सी प्रकल्प सुरू होत आहे. कुर्ला ते वांद्रे दरम्यान किती स्थानके असतील. या प्रकल्पाचे भूमिपूजन झाले असून कंत्राटदार कंपनीने 20 महिन्यांत काम पूर्ण करण्याचे आश्वासन दिले आहे. यामुळे नोकरदारांचा प्रवास सुसाट होईल.
advertisement
1/6
कुर्ला ते वांद्रे अवघ्या काही मिनिटांत! प्रवासाचा वेळ वाचणार, कोणती असतील स्थानकं?
मुंबई शहरातील प्रत्येक उपनगरात गेल्या काही वर्षांत वाढच्या लोकसंख्ये सोबत वाहतूक कोंडीही मोठ्या प्रमाणात वाढली आहे.यामुळे दररोज प्रवास करणाऱ्या प्रवाशांना त्याचा त्रास होतो शिवाय वेळही वाया जातो.
advertisement
2/6
त्यातही जर आपण वांद्रे-कुर्ला अर्थात बीकेसी या परिसराचा विचार केला तर दररोज या भागात व्यवसायासाठी आणि नोकरदार वर्ग मोठ्या प्रमाणात येत असतो,त्यामुळे येथील प्रवासात नागरिकांना मोठ्या वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो.
advertisement
3/6
त्यामुळे एमएमआरडीने पहिल्यांदा तर वांद्रे-कुर्ला दरम्यानही वाढत्या वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक असा पॉड टॅक्सी प्रकल्प हाती घेतला आहे. जो तब्बल 8.85 किमीचा असणार आहे. ज्या प्रकल्पाचे भूमिपूजन मंगळवारी मुख्यमंत्र्‍यांच्या हस्ते करण्यात आले.
advertisement
4/6
पॉड टॅक्सी प्रकल्प हा काही टप्प्यात असून यातील 3.36 किमीचा पहिला टप्पा असेल आणि त्याचे काम 20 महिन्यांत पूर्ण करण्याचे आश्वासनही कंत्राटदार कंपनीने मंगळवारी दिले.
advertisement
5/6
याआधी पॉड टॅक्सी ही सेवा दुबई आणि हिथ्रोमध्ये सुरु करण्यात आली असून मुंबईतही असा प्रकल्प सुरु करण्याचा निर्णय होता मात्र काही कारणांवरुन राहिला होता. मात्र बीकेसीतील वाहतूककोंडीची गंभीर समस्या पाहताना हा प्रकल्प मार्गी लावण्याचा निर्णय घेण्यात आला.
advertisement
6/6
पॉड टॅक्सी प्रकल्पाचे दोन टप्प्यांत काम करणार असून यात एकूण आठ स्थानांचा समावेश असेल. ज्यात कुर्ला पहिले स्थानक असणार आहे त्यानंतर एलबीएस मार्ग, एमएमआरडीए पे अँड पार्क, बीडीबी गेट-11,वांद्रे पूर्व रेल्वे स्थानक, कलानगर, एमएमआरडीएची जुनी इमारत आणि उत्पादन शुल्क विभाग अशी साधारण आठ स्थानके असतील.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मुंबई/
Pod Taxi : कुर्ला ते वांद्रे अवघ्या काही मिनिटांत! प्रवासाचा वेळ वाचणार, कोणती असतील स्थानकं?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल