Marathi Actress : डिवोर्सनंतर डिप्रेशन, मुलासाठी सोडली मालिका; 'मुरांबा' फेम अभिनेत्रीची पुन्हा स्टार प्रवाहवर एन्ट्री
- Published by:Minal Gurav
Last Updated:
मुरांबा मालिकेतील प्रसिद्ध अभिनेत्रीची पुन्हा स्टार प्रवाहवर एन्ट्री झाली आहे. वर्षभरापूर्वी तिने मालिका सोडली होती.
advertisement
1/9

कलाकारांच्या आयुष्यातही अनेक चढउतार येत असतात. त्यातून ते मार्ग काढत आपल्या आयुष्य जगत असतात. पण कधी कधी असा एक क्षण येतो जेव्हा स्वत: साठी जगण्याची वेळ येतो. कुटुंबासाठी वेळ द्यावा लागतो.
advertisement
2/9
असंच काहीसं झालं प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीसोबत. डिवोर्सनंतर आलेलं डिप्रेशन आणि मुलाचा एकटीनं सांभाळ करणं या सगळ्यात अभिनेत्रीला मालिका सोडावा लागली.
advertisement
3/9
मालिका सोडल्यामुळे चाहते नाराज झाले. पण वर्षभरातच अभिनेत्रीची पुन्हा एकदा नव्या मालिकेत एन्ट्री होणार आहे.
advertisement
4/9
आपण बोलत आहोत अभिनेत्री स्मिता शेवाळे हिच्याबद्दल. मुरांबा या मालिकेत स्मिता शेवाळे हिनं जान्हवीची भूमिका साकारली होती. या मालिकेतील तिच्या भूमिकेला चांगला प्रतिसाद मिळत होता. मात्र स्मिताने मालिका सोडली. मुलाचा सांभाळ करण्यासाठी त्याला पुरेसा वेळ देता यावा म्हणून तिने मालिका सोडली होती.
advertisement
5/9
जानेवारी 2025 मध्ये स्मिताने मुरांबा ही मालिका सोडली. त्यानंतर आता वर्षभरात स्मिता स्टार प्रवाहच्या प्रसिद्ध मालिकेत पुन्हा एन्ट्री घेतेय. स्टार प्रवाहवरील 'घरोघरी मातीच्या चुली' मालिका अतिशय महत्त्वाच्या वळणावर येऊन पोहोचली आहे. या मालिकेत आता स्मिताची एन्ट्री होणार आहे.
advertisement
6/9
रणदिवे कुटुंबाला वेठीस धरणाऱ्या मायाचं खरं रूप समोर आल्यानंतर कथानकाला वेगळीच दिशा मिळाली आहे. जानकी, ऐश्वर्या आणि अवंतिका या तिन्ही सुनांनी आता मायाविरोधात उघडपणे लढा देण्याचा निर्णय घेतला आहे.
advertisement
7/9
या संघर्षाला आता कायदेशीर वळण मिळणार असून, मालिकेत दमदार कोर्टरूम ट्रॅक सुरू होणार आहे. मायाच्या बाजूने केस लढवण्यासाठी एण्ट्री होणार आहे नामांकित वकील गीतांजली सरंजामेची. ही भूमिका अभिनेत्री स्मिता शेवाळे साकारणार आहे. गीतांजली सरंजामे ही अत्यंत बुद्धिमान, आत्मविश्वासू आणि निष्णात वकील आहे. ती प्रत्येक केस अत्यंत शांतपणे आणि अचूकतेने हाताळते.
advertisement
8/9
तिच्या कारकिर्दीत तिने एकही केस गमावलेली नाही, त्यामुळे कोर्टात तिची एण्ट्री म्हणजे प्रतिस्पर्ध्यांसाठी मोठं आव्हान असतं. मायाची केस लढण्यासाठी गीतांजली रणांगणात उतरणार असून, जानकीची बाजू लढवणाऱ्या अवंतिकासोबत तिचा सामना रंगणार आहे.
advertisement
9/9
या लढाईत विजय नेमका कुणाचा होणार हे पाहण इंट्रेस्टिंग ठरणार आहे. घरोघरी मातीच्या चुली ही मालिका दररोज रात्री 10.30 वाजता स्टार प्रवाहवर प्रसारित होते.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
Marathi Actress : डिवोर्सनंतर डिप्रेशन, मुलासाठी सोडली मालिका; 'मुरांबा' फेम अभिनेत्रीची पुन्हा स्टार प्रवाहवर एन्ट्री