TRENDING:

बिग बॉसच्या घरात तुफान! तन्वी-रुचिताचा हाय व्होल्टेज ड्रामा, प्रभू ढसाढसा रडला अन्... पहिल्या एपिसोडमध्ये काय घडलं?

Last Updated:
Bigg Boss Marathi 6: घरातील १७ स्पर्धकांना वाटलं होतं की घरातील किमान पहिला दिवस तरी मजेत जाईल, पण बिग बॉसने पहिल्याच दिवशी सर्वांना मोठा धक्का दिला आहे.
advertisement
1/10
तन्वी-रुचिताचा ड्रामा, प्रभू ढसाढसा रडला अन्... पहिल्या एपिसोडमध्ये काय घडलं?
मुंबई: 'बिग बॉस मराठी ६' चा पहिला दिवस आणि पहिल्याच दिवशी घरात जे घडलं, ते पाहून प्रेक्षकांचेही डोळे विस्फारले आहेत. रितेश देशमुख यांनी "नशिबाचा खेळ पालटणार" असं जे म्हटलं होतं, त्याचा प्रत्यय अवघ्या काही तासांतच स्पर्धकांना आला.
advertisement
2/10
८०० खिडक्या आणि ९०० दारांच्या या महालात शिरलेल्या १७ स्पर्धकांना वाटलं होतं की घरातील किमान पहिला दिवस तरी मजेत जाईल, पण बिग बॉसने पहिल्याच दिवशी सर्वांना मोठा धक्का दिला आहे.
advertisement
3/10
घरात शिरल्यावर स्पर्धकांचे लाड होतील असं वाटत असतानाच बिग बॉसने जाहीर केलं की, या घरात काहीही आयतं मिळणार नाही. बेडपासून बाथरूमपर्यंत आणि रेशनपासून आरामापर्यंत सगळं काही कमवावं लागणार आहे. त्यासाठी 'गोल्डन, सिल्व्हर आणि ब्रॉन्झ' रेशन कार्डची संकल्पना मांडण्यात आली.
advertisement
4/10
घरात ओळख करून घेण्याचे सोहळे सुरू असतानाच वादाची पहिली ठिणगी पडली. हिंदी बिग बॉस गाजवून आलेल्या विशाल कोटियनने प्रभू शेळकेला चक्क जिममधील डंबेल्ससारखं उचललं.
advertisement
5/10
प्रभूला हे खटकलं, तो म्हणाला, "माझ्यासोबत अशी मस्करी करू नका." त्यावर विशालने त्याला सुनावले, "तू नावाने डॉन असशील, मी कामाने आहे!" या अपमानामुळे अपमानित झालेल्या प्रभूने थेट बाथरूममध्ये जाऊन येडामायची प्रार्थना करत अश्रू ढाळले.
advertisement
6/10
खरा गेम तर तेव्हा सुरू झाला जेव्हा बिग बॉसने 'तुफान' येणार असल्याची घोषणा केली. पाच मिनिटांचा टायमर लावला गेला आणि बझर दाबण्याचं आव्हान दिलं. घरातील सदस्यांनी अतिआत्मविश्वासात बझर दाबलाच नाही.
advertisement
7/10
परिणामी, बिग बॉसने घराची सर्व दारं-खिडक्या, बेडरूम आणि फर्निचरला कुलूप लावलं. अवस्था इतकी बिकट झाली की, 'मेहनतीचा मार्ग' निवडलेल्यांना जमिनीवर बसावं लागलं, तर 'शॉर्टकट'वाल्यांना फक्त सोफ्याचा आधार उरला.
advertisement
8/10
पिण्याच्या पाण्यासाठी आणि साखरेसाठी वणवण फिरणाऱ्या स्पर्धकांमध्ये खरी ठिणगी तेव्हा पडली, जेव्हा करण सोनवणे तहानेने व्याकुळ होऊन स्विमिंग पूलचं पाणी प्यायला गेला. रुचिता आणि इतरांनी त्याला थांबवलं. त्यावर करणने 'फालतूगिरी' असा शब्द वापरला. मुद्दा करणचा होता, पण भांडण पेटलं ते तन्वी कोल्ते आणि रुचिता जामकरमध्ये.
advertisement
9/10
तन्वीने "तू लिमिट क्रॉस करू नको" असं म्हणताच रुचिताने तिला "बिनडोक, तोंड शेणात घाल" अशा शब्दांत अपमानित केलं. घरातील या पहिल्या कॅट फाईटवर इतर सदस्यांनी चक्क टाळ्या वाजवून आनंद साजरा केला. या अपमानामुळे तन्वीला रडू कोसळलं आणि घरातलं वातावरण पहिल्याच दिवशी तणावपूर्ण झालं.
advertisement
10/10
जेवणाचे वांधे झाल्यावर बिग बॉसने 'शॉर्टकट' निवडलेल्यांसाठी चहा आणि फूड पॅकेट्स पाठवले, तर कष्टाचा मार्ग निवडलेल्यांच्या पदरी फक्त फळं आली. जमिनीवर बसून फळं खाताना कष्टाचा मार्ग निवडलेल्यांना आपल्या निर्णयाचा पश्चात्ताप होत होता की काय, असं वाटू लागलंय.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
बिग बॉसच्या घरात तुफान! तन्वी-रुचिताचा हाय व्होल्टेज ड्रामा, प्रभू ढसाढसा रडला अन्... पहिल्या एपिसोडमध्ये काय घडलं?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल