TRENDING:

'मला त्याचा खूप राग आलाय', अभिनेत्री किशोरी शहाणेंच्या गाडीचा अपघात, पोस्ट शेअर करत संताप व्यक्त

Last Updated:
Kishori Shahane : ज्येष्ठ अभिनेत्री किशोरी शहाणे यांच्या गाडीचा अपघात झाला आहे. पोस्ट शेअर करत त्यांनी आपला संताप व्यक्त केला आहे.
advertisement
1/7
अभिनेत्री किशोरी शहाणेंच्या गाडीचा अपघात, पोस्ट शेअर करत संताप व्यक्त
हिंदी-मराठी मनोरंजनसृष्टीतील प्रसिद्ध ज्येष्ठ अभिनेत्री किशोरी शहाणे यांच्या गाडीचा अपघात झाला आहे. अपघातानंतर सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत त्यांनी आपला संताप व्यक्त केला आहे.
advertisement
2/7
किशोरी शहाणे शूटिंगनिमित्ताने प्रवास करताना त्यांच्या गाडीला दुसऱ्या गाडीचा धक्का लागला. त्यामुळे त्यांच्या गाडीचा साईड मिरर तुटला. याबाबतचा व्हिडीओदेखील त्यांनी सोशल मीडियावर शेअर केला आहे.
advertisement
3/7
किशोरी शहाणे यांनी व्हिडीओ शेअर करत लिहिलं आहे,"सगळ्यांनाच पुढे जाण्याची घाई असते मलाही असते. पण तुम्ही असंवेदनशील कसे असू शकता? कोणाच्यातरी गाडीचा साईड मिरर तुटतोय याकडे साधं तुमचं लक्षदेखील नाही".
advertisement
4/7
किशोरी शहाणे यांनी लिहिलं आहे,"मला त्या व्यक्तीचा खूप राग येत आहे. या नुकसानामुळे तुमचा वेळ, पैसा तर जातोच पण मानसिक त्रासदेखील होतो".
advertisement
5/7
किशोरी शहाणे यांनी पुढे लिहिलं आहे,"कृपया इतरांच्या नुकसानाबद्दल थोडी संवेदनशीलता ठेवा. आपल्यामुळे इतरांचं नुकसान करणं योग्य नाही. आता दुरूस्तीसाठीही वेळ नाही. आपली चूक नसताना हा अनावश्यक ताण वाढला आहे".
advertisement
6/7
किशोरी शहाणे यांनी 'मोरूची मावशी' या नाटकापासून आपल्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात केली. माहेरची साडी, वाजवा रे वाजवा, एक डाव धोबी पछाड, नवरा माझा नवसाचा, रेड : द डार्क साईड, घर एक मंदिर, जस्सी जैसी कोई नही, सिंदूर अशा अनेक हिंदी-मराठी फिल्म आणि मालिकांमध्ये त्यांनी आपल्या अभिनयाने प्रेक्षकांना थक्क केलं आहे.
advertisement
7/7
किशोरी शहाणे आज वयाच्या 57 व्या वर्षीही इंडस्ट्रीत सक्रीय आहेत. आपल्या अभिनय आणि सौंदर्याने त्यांनी इंडस्ट्रीत स्वत:चं वेगळं स्थान निर्माण केलं आहे. तसेच त्यांचा मोठा चाहतावर्ग आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
'मला त्याचा खूप राग आलाय', अभिनेत्री किशोरी शहाणेंच्या गाडीचा अपघात, पोस्ट शेअर करत संताप व्यक्त
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल