Bigg Boss Marathi 6 : विशाल सांगतोय, ते ऐका! घरातील सदस्यांना 'बिग बॉस'ने का दिला असा सल्ला?
- Published by:Priya Lad
Last Updated:
Bigg Boss Marathi 6 Vishal : एकीकडे राकेशसोबत राडा केल्यानंतर बिग बॉसने विशालला शिक्षा सुनावली आहे आणि दुसरीकडे घरातील सदस्यांना त्याचं ऐकण्याचा सल्ला देत आहेत, असं का?
advertisement
1/7

बिग बॉस मराठी 6 च्या घरात सध्या विशाल कोटियन सर्वाधिक चर्चेत आहे तो म्हणजे राकेश बापटसोबतच्या राड्यामुळे. विशालला थेट घराबाहेर काढण्याची मागणी जोर धरू लागली आहे, अशात आता बिग बॉस विशालचं ऐकण्याचा सल्ला देत आहेत.
advertisement
2/7
बिग बॉस मराठी 6 च्या नव्या एपिसोडचा प्रोमो समोर आला आहे. ज्यात बिग बॉस विशाल जे सांगतोय, ते खरंच ऐका असं बिग बॉस म्हणताना ऐकू येतं.
advertisement
3/7
विशाल राकेशसोबत जे वागलं त्याचे पडसाद सोशल मीडियावर उमटत आहेत, बिग बॉसनेही त्याला शिक्षा सुनावली आहे मग बिग बॉस आता घरातील सदस्यांना त्याचं ऐकण्याचा सल्ला का देत आहेत? हे नेमकं काय प्रकरण आहे? असा प्रश्न तुम्हालाही पडला असेल.
advertisement
4/7
तर आता घरात प्राइझ मनी टास्क होणार आहे. त्यासाठी बिग बॉसने जोड्या बनवल्या आहेत. प्रोमोत राखी आणि दिपालीची जोडी बनवलेली दाखवली आहे. यामुळे घरातील सगळ्याच सदस्यांना धक्का बसतो. "व्वा काय जोडी बनवली आहे", अशी प्रतिक्रिया तन्वी देते.
advertisement
5/7
पुढे बेडरूममध्ये यावरून घरातील सदस्यांमध्ये चर्चा होताना दिसते. विशाल सगळ्यांना सांगतो, 'आता प्रार्थना करा' यावरच बिग बॉस बोलू लागतात, "विशाल जे सांगत आहेत, ते खरंच ऐका"
advertisement
6/7
याचं कारणही बिग बॉसने दिलं आहे. ते म्हणाले, "राखीचा रेकॉर्ड आहे, एकाही सीझनमध्ये तिने एकही रुपया वाचवलेला नाही" हे ऐकताच सगळ्या सदस्यांना मोठा शॉक बसतो.
advertisement
7/7
आता बिग बॉसच्या या सीझनमध्येही प्राइझ मनी टास्कमध्ये पैसे न वाचवण्याचा आपला रेकॉर्ड राखी कायम ठेवणार की प्राइझ मनी वाचवून जुना रेकॉर्ड मोडून आपला नवीन रेकॉर्ड बनवणार, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
Bigg Boss Marathi 6 : विशाल सांगतोय, ते ऐका! घरातील सदस्यांना 'बिग बॉस'ने का दिला असा सल्ला?