TRENDING:

प्रभू शेळकेला आठ वर्षांपासून गंभीर आजार, 'काळू डॉन'च्या उपचारासाठी वडिलांनी विकलंय वावर, नेमकं झालंय काय

Last Updated:
Prabhu Shelke :'बिग बॉस मराठी 6'च्या घरात पहिल्याच दिवशी काळू डॉन अर्थात प्रभू शेळकेने आपल्या गंभीर आजाराबाबत भाष्य केलं आहे. वयाच्या आठव्या वर्षापासून तो गंभीर आजाराशी झुंज देत आहे.
advertisement
1/7
प्रभू शेळकेला आठ वर्षांपासून गंभीर आजार, उपचारासाठी वडिलांनी विकलंय वावर
'बिग बॉस मराठी 6'चा पहिला एपिसोड नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला असून यातील एका स्पर्धकाने मात्र नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. जालना जिल्ह्यातील गरीब कुटुंबातून आलेला सोशल मिडिया स्टार 'छोटा डॉन' अर्थात प्रभू शेळके.
advertisement
2/7
'छोटा डॉन' सोशल मीडियावर प्रचंड लोकप्रिय आहे. त्याचे इन्स्टाग्रामवर 2.3 मिलियन फॉलोअर्स आहेत. विनोदी रिल्स आणि हटके स्टाईलने ओळखल्या जाणाऱ्या 'छोटा डॉन'ने प्रचंड हालाखीतून मार्ग काढत स्वत:चं एक वेगळं स्थान निर्माण केलं आहे.
advertisement
3/7
प्रभू शेळकेचा जन्म जालना जिल्ह्यातील परतूर तालुक्यातील वलखेड या गावी एका गरीब कुटुंबात झाला आहे. याच गावचा तो रहिवासी आहे.
advertisement
4/7
छोटा डॉन एका गंभीर आजाराशी झुंज देत आहे. त्याला 'थॅलेसेमिया' हा आजार आहे. या आजाराच्या उपचाराचा खर्च मोठा असल्याने त्याच्या आई-वडिलांना वावरदेखील शेतीदेखील विकावी लागली.
advertisement
5/7
'बिग बॉस मराठी 6'च्या पहिल्याच एपिसोडमध्ये 'छोटा डॉन'ने आपल्या गंभीर आजाराबाबत भाष्य केलं. 'छोटा डॉन' म्हणला,"मला 'थॅलेसेमिया' हा आजार आहे. गेल्या आठ वर्षांपासून मला हा आजार आहे".
advertisement
6/7
प्रभू शेळके म्हणाला,"थॅलेसेमिया या आजारात शरीरातील रक्तपेशी नष्ट होतात. त्यामुळे त्याला दर महिन्याला रक्त बदलावं लागतं. माझा हातदेखील मोडलेला आहे".
advertisement
7/7
'बिग बॉस मराठी 6'च्या पहिल्या एपिसोडमध्ये विशाल कोटियनच्या बोलण्याने काळू डॉन दुखावला गेला. विशाल काळू डॉनला उचलून घेत म्हणाला होता,"घरात डंबल कमी पडले तर हा आहे". यामुळे दुखावलेला काळू डॉन वॉशरुममध्ये जातो आणि देवीआईला प्रार्थना करत म्हणतो,"माझी देवीआई प्लीज मला साथ दे. मला माहिती आहे तू माझ्या पाठीशी राहणार आहेस. तू माझी माय आहेस. दर महिन्याला रक्त बदलावं लागतं. हा आजार बरा करण्यासाठी मी इथे आलो आहे". प्रभू शेळके आजही पत्र्याच्या घरात राहतो.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
प्रभू शेळकेला आठ वर्षांपासून गंभीर आजार, 'काळू डॉन'च्या उपचारासाठी वडिलांनी विकलंय वावर, नेमकं झालंय काय
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल