TRENDING:

'सोनावणे वहिनी' फेम करण सोनावणे या स्पेशल व्यक्तीसाठी आलाय 'बिग बॉस मराठी 6'च्या घरात, म्हणाला,"आता ट्रॉफी जिंकणारच"

Last Updated:
Karan Sonawane : 'सोनावणे वहिनी' फेम सोशल मीडिया स्टार करण सोनावणे आईसाठी 'बिग बॉस मराठी 6'मध्ये सहभागी झाला आहे.
advertisement
1/7
करण सोनावणे या स्पेशल व्यक्तीसाठी आलाय 'बिग बॉस मराठी 6'च्या घरात
'सोनावणे वहिनी' फेम सोशल मीडिया स्टार करण सोनावणे याने 'बिग बॉस मराठी 6'च्या घरात दमदार एन्ट्री घेतली आहे. 'बिग बॉस'च्या घरात एन्ट्री करताना रितेश भाऊसमोर करण म्हणाला होता,"मी इथे गेम खेळायला आलो आहे, माझ्याशी कोणी पंगा घेतला तर मी त्याला उत्तर देईल".
advertisement
2/7
करण सोनावणे 'फोकस इंडियन' यानानेदेखील चर्चेत असतो. मध्यमवर्गीय मराठी कुटुंबात जन्माला आलेल्या करणने मेहनतीने रिल विश्वास स्वत:चं अस्तिस्व निर्माण केलं आहे.
advertisement
3/7
करण सोनावणेचा मोठा चाहतावर्ग असून त्याला 'बिग बॉस मराठी 6'मध्ये पाहून चाहते सुखावले आहेत. विशेष म्हणजे करणने आईसाठी 'बिग बॉस मराठी'मध्ये यायचं ठरवलं होतं.
advertisement
4/7
करण सोनावणे म्हणतो,"माझी आई 'बिग बॉस मराठी' या कार्यक्रमाची मोठी चाहती आहे. तू सोशल मीडियावर कन्टेंट करत असलास, तरी तू 'बिग बॉस'च्या घरात गेलास तरच खरा सेलिब्रिटी झालास, असं की म्हणायची. तिची ही इच्छा पूर्ण करण्यासाठी आणि नवी संधी, माध्यम व नव्या प्रेक्षकांशी जोडून घेण्यासाठी मी या कार्यक्रमात जायचं ठरवलं".
advertisement
5/7
करण सोनावणे पुढे म्हणाला,"मला आधीपासूनच अभिनेता व्हायचं होतं. पण ऑडिशनला गेल्यावर लोक हसतील म्हणून मी ते नेहमी टाळायचो. सिनेमे बघत मोठा झालो असल्याने कॅमेरा, फ्रेमिंगची माहिती होती. अभिनयाची आवड असल्याने युट्यूब चॅनल सुरु केलं. यशस्वीरित्या सोशल मीडियावर काम केल्यावर आता टीव्ही, सिनेमा या माध्यमातही झळकावं या उद्देशाने मी पुढची पावलं टाकत आहे".
advertisement
6/7
करण सोनावणे 'बिग बॉस मराठी 6'च्या घरात सहभागी झाल्यानंतरही तो सोशल मीडियावर सक्रीय दिसेल. कारण त्याने बराच कटेंट आधी तयार करुन ठेवला आहे. त्यामुळे आपल्या अनोख्या रिल्सच्या माध्यमातून तो सोशल मीडियावरील चाहत्यांच्या भेटीला येतच राहिल.
advertisement
7/7
'बिग बॉस मराठी 6'ची ट्रॉफी जिंकण्याचं करणचं स्पप्न आहे. आता येणाऱ्या दिवसांत तो टास्क कसा खेळतोय, आपल्या खेळाने तो प्रेक्षकांचं मन कसं जिंकणार हे पाहावे लागेल.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
'सोनावणे वहिनी' फेम करण सोनावणे या स्पेशल व्यक्तीसाठी आलाय 'बिग बॉस मराठी 6'च्या घरात, म्हणाला,"आता ट्रॉफी जिंकणारच"
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल