TRENDING:

Bigg Boss च्या पहिल्या सीझनचा विजेता कोण होता? 15 स्टार स्पर्धक झालेले सहभागी

Last Updated:
Bigg Boss 19 हा कार्यक्रम आता अंतिम टप्प्यात आला असून लवकरच या सीझनच्या विजेत्याची घोषणा होणार आहे. पण 'बिग बॉस'च्या पहिल्या सीझनचा विजेता कोण होता? हे तुम्हाला माहिती आहे का? जाणून घ्या...
advertisement
1/7
Bigg Boss च्या पहिल्या सीझनचा विजेता कोण होता? जाणून घ्या
'बिग बॉस 19' हा छोट्या पडद्यावरील वादग्रस्त कार्यक्रम आता अंतिम टप्प्यात आला आहे. त्यामुळे या सीझनचा विजेता कोण होणार हे जाणून घेण्यास प्रेक्षक आता उत्सुक आहेत. पण 'बिग बॉस'च्या पहिल्या सीझनचा विजेता कोण होता? हे तुम्हाला आठवतंय का?
advertisement
2/7
'बिग बॉस'चा पहिला सीझन 2006 मध्ये सुरू झाला होता. 3 नोव्हेंबर ते 26 जानेवारी 2007 पर्यंत हा पहिला सीझन सुरू होता. जवळजवळ 86 दिवस टीव्हीवर हा सीझन प्रसारित झाला.
advertisement
3/7
'बिग बॉस'ची क्रेझ चाहत्यांमध्ये पहिल्या सीझनपासूनच होती. बॉलिवूड अभिनेता अरशद वारसी यांनी 'बिग बॉस'चा पहिला सीझन होस्ट केला. पण त्यानंतर ते कधीही बिग बॉस होस्ट करताना दिसले नाहीत. तर दुसरा सीझन शिल्पा शेट्टी होस्ट करताना दिसली.
advertisement
4/7
'बिग बॉस'च्या पहिल्या सीझनचा विजेता राहुल रॉय (Rahul Roy) ठरला होता. राहुल रॉयने 'बिग बॉस'च्या पहिल्या सीझनच्या मानाच्या ट्रॉफीवर आपलं नाव कोरलं. त्यावेळी राहुलवर चाहत्यांकडून प्रेमाचा वर्षाव झाला होता. राहुल रॉयला त्यावेळी बिग बॉसच्या ट्रॉफीसह 1 कोटी रुपयेदेखील मिळाले होते.
advertisement
5/7
'आशिकी'च्या माध्यमातून राहुल रॉय चांगलाच लोकप्रिय झाला. 'आशिकी'च्या लोकप्रियतेनंतर त्याने अनेक चित्रपटांत आपल्या अभिनयाची छाप पाडली. पण आशिकीप्रमाणे इतर चित्रपटांत त्याची क्रेझ पाहायला मिळाली नाही.
advertisement
6/7
'बिग बॉस'च्या पहिल्या सीझनमध्ये राहुल रॉय, कैरल ग्रेसियस, रवि किशन, राखी सावंत, अमित साध, रुपाली गांगुली, बाबा सहगल, रागिणी शेट्टी, दीपक तिजोरी, अनुपमा वर्मा, आर्यन वैद, कश्मीरा शाह, दीपक पाराशर, बॉबी डार्लिंग, सलिल अंकोला हे स्पर्धक सहभागी झाले होते.
advertisement
7/7
'बिग बॉस 19'चा विजेता कोण होणार याकडे आता बिग बॉस प्रेमींच्या नजरा लागल्या आहेत. येत्या 7 डिसेंबरला 'बिग बॉस 19'चा ग्रँड फिनाले पार पडणार आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
Bigg Boss च्या पहिल्या सीझनचा विजेता कोण होता? 15 स्टार स्पर्धक झालेले सहभागी
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल