TRENDING:

WPL Auction : स्मृतीसोबत लग्न समारंभात डान्स केला, त्या चौघींचं WPL लिलावात काय झालं?

Last Updated:
महिला प्रीमियर लीग (WPL) 2026 चा लिलाव नवी दिल्लीमध्ये पार पडला. वर्ल्ड कप विजेती ऑलराऊंडर दीप्ती शर्मा ही लिलावातली सगळ्यात महागडी खेळाडू ठरली. यूपी वॉरियर्सनी दीप्तीला 3 कोटी 20 लाख रुपयांना विकत घेतलं.
advertisement
1/5
स्मृतीसोबत लग्न समारंभात डान्स केला, त्या चौघींचं WPL लिलावात काय झालं?
आरसीबीची कर्णधार आणि टीम इंडियाची उपकर्णधार स्मृती मानधना ही मागच्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. वडिलांना हृदयविकाराचा झटका आल्यानंतर स्मृतीने पलाश मुच्छलसोबतचं तिचं लग्न पुढे ढकललं.
advertisement
2/5
स्मृतीच्या लग्नासाठी टीम इंडियाच्या क्रिकेटपटू सांगलीला गेल्या होत्या. या क्रिकेटपटूंनी लग्नाआधीच्या सगळ्या कार्यक्रमांचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केले. पण लग्न पुढे ढकलल्यानंतर या पोस्ट डिलीट करण्यात आल्या.
advertisement
3/5
स्मृती मानधनाने तिच्या लग्नाची अधिकृत घोषणा टीम इंडियाच्या खेळाडूंसोबत डान्स रील शेअर करून केली होती. जेमिमा रॉड्रिग्जने हा व्हिडिओ शेअर केला होता. या व्हिडिओमध्ये जेमिमासह राधा यादव, श्रेयांका पाटील आणि अरुंधती रेड्डी डान्स करताना दिसत होत्या. या व्हिडिओमध्ये स्मृतीने तिच्या हातातली अंगठी दाखवून लग्नाची अधिकृत घोषणा केली.
advertisement
4/5
स्मृतीसोबत या व्हिडिओमध्ये दिसणाऱ्या क्रिकेटपटू महिला प्रीमियर लीगच्या 2026 च्या मोसमात आरसीबीकडून म्हणजेच स्मृतीच्या टीमकडून खेळणार आहेत. अरुंधती रेड्डीला आरसीबीने 75 लाख रुपयांना तर राधा यादवला 65 लाख आणि श्रेयांका पाटीलला 60 लाख रुपयांमध्ये विकत घेतलं.
advertisement
5/5
जेमिमा रॉड्रिग्जला दिल्ली कॅपिटल्सने रिटेन केलं होतं, जेमिमासाठी दिल्लीने 2.20 कोटी रुपये मोजले. जेमिमा ही दिल्लीची यंदाच्या मोसमातली महागडी खेळाडू आहे. जेमिमासोबतच दिल्लीने शफाली वर्मा आणि एनाबेल सदरलँडसाठी 2.20 कोटी रुपये मोजले आहेत.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/स्पोर्ट्स/
WPL Auction : स्मृतीसोबत लग्न समारंभात डान्स केला, त्या चौघींचं WPL लिलावात काय झालं?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल