TRENDING:

RCB कडून खेळणार जगातली सगळ्यात सुंदर खेळाडू, स्मृतीच्या हाती आली 6 फुटांची खतरनाक बॉलर!

Last Updated:
महिला प्रीमियर लीग (WPL) च्या लिलावात भारताची वर्ल्ड कप विजेती खेळाडू दीप्ती शर्मा सगळ्यात महागडी ठरली. दीप्तीला यूपी वॉरियर्सनी 3 कोटी 20 लाख रुपयांना विकत घेतलं. पण डब्ल्यूपीएलच्या या लिलावानंतक आरसीबीच्या ग्लॅमरस खेळाडूची सर्वाधिक चर्चा सुरू आहे.
advertisement
1/6
RCB कडून खेळणार जगातली सगळ्यात सुंदर खेळाडू, स्मृतीच्या हाती 6 फुटांची बॉलर!
लॉरेन बेलला आरसीबीने 90 लाख रुपयांना विकत घेतलं. लॉरेन बेलची बेस प्राईज 30 लाख रुपये होती. लॉरेन बेल आता स्मृती मानधनाच्या आरसीबीकडून खेळेल.
advertisement
2/6
लॉरेन बेल ही आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधल्या सगळ्यात सुंदर क्रिकेटपटूंपैकी एक आहे. 6 फूट 1 इंच हाईट असलेल्या लॉरेन बेलचे क्रिकेट विश्वात अनेक चाहते आहेत.
advertisement
3/6
फास्ट बॉलर असलेली लॉरेन बेल हिने इंग्लंडकडून 5 टेस्ट, 31 वनडे आणि 36 टी-20 मॅच खेळल्या आहेत. बेलने महिला टेस्ट मॅचमध्ये 24.11 च्या सरासरीने 18 विकेट घेतल्या ज्यात तिने दोन वेळा इनिंगमध्ये 4 विकेट घेतल्या.
advertisement
4/6
वनडे क्रिकेटमध्ये लॉरेन बेलच्या नावावर 30.54 च्या सरासरीने 44 विकेट आहेत. इनिंगमध्ये 5 विकेट घेण्याचा विक्रम तिने एकदा केला आहे. टी-20 आंतरराष्ट्रीयमध्ये लॉरेन बेलने 18.34 च्या सरासरीने 50 विकेट घेतल्या, ज्यात एका इनिंगमध्ये 4 विकेट घेण्याचं रेकॉर्ड तिने एकदा केलं आहे.
advertisement
5/6
लॉरेन बेल डब्ल्यूपीएलमध्ये यूपी वॉरियर्सच्या टीममध्येही होती, पण तिला एकही मॅच खेळण्याची संधी मिळाली नाही. लॉरेन बेलचं फुटबॉलसोबतही नातं होतं. 16व्या वर्षापर्यंत तिने रीडिंग एफसी अकॅडमीकडून फुटबॉल खेळला.
advertisement
6/6
लॉरेन बेलची उंची 6.1 फूट आहे, त्यामुळे तिचं टोपण नाव 'द शार्ड' ठेवण्यात आलं आहे. द शार्ड ही लंडनमधील 72 मजली बिल्डिंग आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/स्पोर्ट्स/
RCB कडून खेळणार जगातली सगळ्यात सुंदर खेळाडू, स्मृतीच्या हाती आली 6 फुटांची खतरनाक बॉलर!
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल