Tata Sierra च्या नंतर Mahindra चा धमाका, आणली 7 सीटर आलिशान SUV, फिचर्समध्ये किंग!
- Published by:Sachin S
Last Updated:
महिंद्रा अँड महिंद्राने आता एसयूव्ही सेगमेंटमध्ये आणखी एक कार लाँच करून धमाका केला आहे. महिंद्राने आपली पहिली ७ सीटर एसयूव्ही लाँच केली आहे. या ७ सीटर एमपीव्हीचं नाव Mahindra XEV 9S असं आहे.
advertisement
1/10

भारतातील सर्वात मोठी वाहन उत्पादक कंपनीपैकी एक असलेल्या महिंद्रा अँड महिंद्राने आता एसयूव्ही सेगमेंटमध्ये आणखी एक कार लाँच करून धमाका केला आहे. महिंद्राने आपली पहिली ७ सीटर एसयूव्ही लाँच केली आहे. या ७ सीटर एमपीव्हीचं नाव Mahindra XEV 9S असं आहे. ही आधीच्या Mahindra xuv 007 सारखीच दिसायला आहे पण तिच्यापेक्षा ही थोडी वेगळी आहे. ही एक ईलेक्ट्रिक एमपीव्ही आहे.
advertisement
2/10
Mahindra XEV 9S मध्ये प्रीमियम असे फिचर्स दिले आहे. याामध्ये अडेप्‍टिव्ह क्रुज कंट्रोल, ड्रायव्हिंगसाठी अनेक मोड्स, बूस्‍ट मोड, एलईडी डीआरएल, सिक्‍वेंशल टर्न इंडिकेटर, लेदर रॅप इंटररियर दिलं आहे.
advertisement
3/10
तसंच 18 इंच अलॉय व्‍हील्‍स, पॅनोरमिक सनरूफ, एलईडी हेडलाइट्स, एलईडी टेल लाइट, पावर्ड ड्राइवर सीट, फ्लश डोअर हँडल, ड्यूल जोन ऑटो एसी, की-लेस एंट्री सारखे फिचर्स दिले आहे.
advertisement
4/10
एवढंच नाहीतर, विंडशील्‍डसाठी ऑटो डिफॉगर, ट्रिपल स्‍क्रीन सुद्धा दिली आहे. नुकतीच टाटा सियाराने आपल्या गााडीत ट्रिपल स्क्रिन दिली आहे. त्यानंतर आता महिंद्रानेही ट्रिपल स्क्रिन दिली आहे.
advertisement
5/10
त्याचबरोबर 16 स्‍पीकर, हरमन ऑडिओ सिस्‍टम, एनएफसी कार्ड, वायरलेस अँड्राइड ऑटो, एपल कार प्‍ले, कनेक्‍टिड फीचर्स, अमेझान एलेक्‍सा, ७ एअरबॅग, लेवल-2 ADAS, 360 डिग्री कॅमेरा, फ्रंट पार्किंग सेंसर सगळ्या चाकांवर डिस्‍क ब्रेक, ड्रायव्हर ड्रॉजिनेस सिस्‍टम, टीपीएमएस सारखे फिचर्स दिले आहे.
advertisement
6/10
Mahindra XEV 9S मध्ये दोन बॅटरीचे पर्याय दिले आहे. यामध्ये एक 59 kWh आणि 79 kWh क्षमेच्या दोन बॅटरी दिल्या आहेत.
advertisement
7/10
फास्‍ट चार्जरवर ही एसयूव्ही फक्त 20 मिनिटांमध्ये 20 ते 80 टक्के चार्ज होते. या Mahindra XEV 9S मध्ये दिलेल्या मोटरमधून 180 किलोवॅटची पॉवर जनरेट होते. सोबतच यामध्ये रिजनरेटिव्ह टेक्नालॉजी दिली आहे.
advertisement
8/10
Mahindra XEV 9S च्या किंमतही जाहीर करण्यात आली आहे. भारतात या ७ सीटर एमपीव्हीची किंमत 19.95 लाख रुपयांपासून एक्‍स शोरूम सुरू होते. Mahindra XEV 9S चं टॉप व्हेरिएंटची एक्‍स शोरूम किंमत 29.45 लाख रुपये इतकी आाहे.
advertisement
9/10
Mahindra XEV 9S साठी बुकिंगही 14 जानेवरी 2026 पासून सुरू झाली आहे. त्यानंतर या Mahindra XEV 9S ची डिलिव्हरी 23 जानेवरी 2026 पासून सुरू होईल.
advertisement
10/10
Mahindra XEV 9S च्या रेंजबद्दल बोलायचं झालं तर यामध्ये ३ पर्याय दिले आहे, 59 kwh बॅटरीमध्ये ही एमपीव्ही 400 किमी रेंज देईल असा दावा कंपनीने केला आहे. तर 70 kWh बॅटरी मध्ये ४५० किमी आणि 79 kWh बॅटरी पॅकमध्ये ५०० ते ५५० किमी रेंज देऊ शकते, असा दावा कंपनीने केला आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/ऑटो/
Tata Sierra च्या नंतर Mahindra चा धमाका, आणली 7 सीटर आलिशान SUV, फिचर्समध्ये किंग!