2000 कोटींची ब्लॉकबस्टर देणाऱ्या सुपरस्टारला साधं रिमोट चालवता येत नाही, 4 वर्ष घरात पडून होता लॅपटॉप, कोण आहे तो?
- Published by:Pratiksha Pednekar
Last Updated:
सुपरस्टार अभिनेत्याने काजोल आणि ट्विंकल खन्नाच्या शोमध्ये टीव्हीचा रिमोट वापरता न येणं आणि शाहरुख खानने दिलेला लॅपटॉप चार वर्षे न वापरण्याचा किस्सा सांगितला.
advertisement
1/7

मुंबई: बॉलिवूडमध्ये आपल्या कामातील बारीकसारीक गोष्टींची दखल घेणारा, 'मिस्टर परफेक्शनिस्ट' म्हणून ओळखला जाणारा अभिनेता आमिर खान हा पडद्यावर हुशार आणि टेक्नोलॉजीचा वापर करणारा दिसतो, मात्र तो खऱ्या आयुष्यात तंत्रज्ञानाच्या बाबतीत अज्ञानी आहे. त्याने स्वतःच एका मुलाखतीत हा खुलासा करून सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला आहे.
advertisement
2/7
'राजा हिंदुस्तानी', 'पीके', 'लगान' यांसारख्या सुपरहिट चित्रपटांमधून आमिरने स्वतःला वेळोवेळी सिद्ध केले आहे. तो प्रत्येक सीनसाठी खूप मेहनत घेतो. 'धूम ३' मध्ये तर त्याने एका अट्टल चोराची भूमिका केली होती.
advertisement
3/7
दरम्यान, काजोल आणि ट्विंकल खन्नाच्या एका टॉक शोमध्ये आमिरने त्याच्या आयुष्यातील एक गंमतशीर आणि आश्चर्यकारक गुपित उघड केले. तो म्हणाला, "मी टेक्निकल चॅलेंज स्वीकारू शकत नाही. मला घरी टीव्हीचा रिमोटसुद्धा वापरता येत नाही, टीव्हीही चालू करता येत नाही." हा खुलासा ऐकून सलमान खान, काजोल आणि ट्विंकल खन्ना यांनाही विश्वास बसला नाही.
advertisement
4/7
तंत्रज्ञानाच्या बाबतीत तो किती आळशी आहे, हे सांगताना आमिरने एक जुना आणि मजेशीर किस्सा सांगितला. तो म्हणाला, "१९९६ मध्ये मी आणि शाहरुख खान एका शोमध्ये गेलो होतो. शोच्या शेवटी शाहरुख म्हणाला, 'मी एक नवीन लॅपटॉप खरेदी करत आहे आणि मी तो तुझ्यासाठी पण घेणार, जेणेकरून तू स्वतः काहीतरी सुरू करू शकशील.'"
advertisement
5/7
आमिर पुढे म्हणाला, "आम्ही भारतात परतलो, आणि त्यानंतर तब्बल चार वर्षे झाली. माझा मॅनेजर एकदा मला म्हणाला, 'साहेब, मला कामासाठी लॅपटॉप हवा आहे. तुमच्या कपाटात तोशिबाचा एक लॅपटॉप पडलेला असतो, जो तुम्ही वापरत नाही. मी वापरू का?'"
advertisement
6/7
"मी आश्चर्यचकित होऊन विचारले, 'कसला लॅपटॉप?' तो लॅपटॉप पाहिल्यावर माझ्या लक्षात आले की तो शाहरुखने चार वर्षांपूर्वी दिलेला होता. मी तो एकदाही सुरू केलेला नव्हता!" अखेर, मॅनेजरला तो वापरायला दिला, पण तोपर्यंत बॅटरी आणि इतर गोष्टींमुळे तो लॅपटॉप पुन्हा कधीच सुरू झाला नाही.
advertisement
7/7
१४ मार्च १९६५ रोजी जन्मलेल्या मोहम्मद आमिर हुसेन खानने १९८८ मध्ये 'कयामत से कयामत तक'मधून पदार्पण केले. त्याचे वडील ताहिर हुसेन प्रसिद्ध चित्रपट निर्माते होते. आमिरने १९८६ मध्ये रीना दत्तासोबत पहिले लग्न केले, पण २००२ मध्ये त्यांचा घटस्फोट झाला. २००५ मध्ये त्याने किरण रावशी दुसरे लग्न केले, पण २०२१ मध्ये ते वेगळे झाले. सध्या तो गौरी स्प्राटला डेट करत आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
2000 कोटींची ब्लॉकबस्टर देणाऱ्या सुपरस्टारला साधं रिमोट चालवता येत नाही, 4 वर्ष घरात पडून होता लॅपटॉप, कोण आहे तो?