Potato : कोंब आलेले बटाटे खावेत का? तुम्हीही कोंब काढून खात असाल तर थांबा आधी हे वाचा
- Published by:Devika Shinde
Last Updated:
घरात बटाटे काही दिवस ठेवल्यावर त्याला कोंब फुटायला लागतात. आपण अनेकदा पाहतो की आई किंवा आजी असे कोंबलेले बटाटे कोंब काढून वापरतातही. पण खरोखर असं करणं आपल्या आरोग्यासाठी सुरक्षित आहे का?
advertisement
1/8

भारतीय स्वयंपाकघरात अशी एक भाजी आहे जी जवळपास प्रत्येक पदार्थात वापरली जाते. ती म्हणजे बटाटा. बटाट्याशिवाय आपल्या स्वयंपाकाची कल्पनाही करता येत नाही. तो स्वतंत्र भाजी म्हणून छान लागतो आणि इतर भाज्यांसोबत मिसळूनही प्रत्येक डिशला खास चव देतो. अगदी फास्टफूडपासून पारंपरिक जेवणापर्यंत बटाट्याशिवाय काहीच पूर्ण वाटत नाही.
advertisement
2/8
पण घरात बटाटे काही दिवस ठेवल्यावर त्याला कोंब फुटायला लागतात. आपण अनेकदा पाहतो की आई किंवा आजी असे कोंबलेले बटाटे कोंब काढून वापरतातही. पण खरोखर असं करणं आपल्या आरोग्यासाठी सुरक्षित आहे का?
advertisement
3/8
कोंब आलेले बटाटे आरोग्यासाठी घातककोंब आलेले बटाटे खाणं आरोग्यासाठी चांगलं नाही. बटाट्याला कोंब फुटतो म्हणजे त्यामध्ये एक रासायनिक प्रक्रिया सुरू झाल्याचं संकेत असतो. या प्रक्रियेदरम्यान बटाट्यातील कार्बोहायड्रेट (स्टार्च) साखरेत रूपांतरित होतं, त्यामुळे बटाटा नरम आणि हिरवट दिसू लागतो.
advertisement
4/8
यावेळी बटाट्यामध्ये सोलानिन (Solanine) आणि अल्फा-कॅकोनिन (Alpha-chaconine) नावाचे दोन अल्कलॉइड तयार होतात. सोलानिन हे आपल्या शरीरासाठी विषारी असू शकतं आणि ते पचनाच्या तक्रारी, उलट्या किंवा पोटदुखीसारख्या समस्यांना कारणीभूत ठरू शकतं. त्यामुळे नरम, हिरवट किंवा कोंबलेले बटाटे खाणं टाळणंच उत्तम.
advertisement
5/8
बटाट्यांना कोंब लागू नयेत यासाठी घरगुती उपायबटाटे योग्य पद्धतीने साठवले, तर त्यांना लवकर कोंब लागणार नाहीत. चला काही सोपे उपाय जाणून घेऊ
advertisement
6/8
बटाटे कागदात गुंडाळून ठेवा.त्यांना थंड आणि अंधाऱ्या जागेत साठवा.अधूनमधून हाताने हलवून बघा, जेणेकरून ओलावा राहणार नाही.बटाटे नेहमी सुती कपड्याच्या पिशवीत ठेवा.बटाट्यावर पाणी पडल्यास लगेच कोरडे पुसा.
advertisement
7/8
कांदा आणि बटाटा वेगळे ठेवाएक महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या अनेक महिला कांदा आणि बटाटा एकत्र ठेवतात. पण असं कधीही करु नका. असे केल्यास दोघेही लवकर सडतात आणि बुरशी येण्याची शक्यता वाढते. दोन्ही भाज्या नेहमी हवेशीर जागेत आणि इतर भाज्यांपासून दूर ठेवा. तसेच बटाटे फ्रिजमध्ये ठेवणं टाळा, कारण त्यामुळे त्यांची गुणवत्ता कमी होते.
advertisement
8/8
बटाटा हा आपल्या स्वयंपाकघराचा अविभाज्य भाग आहे, पण कोंब आलेला बटाटा खाणं आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकतं. योग्य साठवणूक आणि काळजी घेतल्यास हे कोंब येणं टाळता येतं आणि आपण बटाट्याची चव आणि पौष्टिकता दोन्ही सुरक्षित ठेवू शकतो.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/
Potato : कोंब आलेले बटाटे खावेत का? तुम्हीही कोंब काढून खात असाल तर थांबा आधी हे वाचा