'मी हे काय करून बसलो?' 377 कोटी कमावणारी फिल्म करून अभिनेत्याला होतोय पश्चात्ताप, म्हणतो...
- Published by:Pratiksha Pednekar
Last Updated:
Bollywood Controversial Movie : वादग्रस्त चित्रपटात काम केलेले ज्येष्ठ अभिनेत्याने एक मोठा खुलासा केला असून, त्यांना या चित्रपटात काम केल्याचा पश्चात्ताप होत आहे.
advertisement
1/8

मुंबई: २०१९ मध्ये प्रदर्शित झालेला अभिनेता शाहिद कपूर आणि कियारा अडवाणी यांचा चित्रपट 'कबीर सिंह' बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरला, पण त्याच वेळी या चित्रपटावर तीव्र टीका झाली.
advertisement
2/8
दिग्दर्शक संदीप रेड्डी वांगा यांच्या या चित्रपटाला अनेकांनी महिलाविरोधी म्हटले होते. आता या वादग्रस्त चित्रपटात काम केलेले ज्येष्ठ अभिनेते आदिल हुसैन यांनी एक मोठा खुलासा केला असून, त्यांना या चित्रपटात काम केल्याचा पश्चात्ताप होत आहे.
advertisement
3/8
एका मुलाखतीत आदिल हुसैन यांनी सांगितले की, 'कबीर सिंह'साठी भूमिका स्वीकारण्यापूर्वी त्यांनी चित्रपटाची स्क्रिप्ट वाचली नव्हती, तसेच मूळ तेलुगू चित्रपट 'अर्जुन रेड्डी' देखील पाहिला नव्हता. ते म्हणाले, "मी सतत 'मुक्ती भवन' चित्रपटाच्या निमित्ताने प्रवास करत होतो, त्यामुळे स्क्रिप्ट वाचायला वेळ मिळाला नाही."
advertisement
4/8
विशेष म्हणजे, आदिल हुसैन यांनी सुरुवातीला हा चित्रपट नाकारण्याचा प्रयत्न केला होता. त्यांनी आपल्या मॅनेजरला सांगितले की, ते जी सामान्य फी घेतात, तिच्या पाचपट जास्त फी निर्मात्यांना सांगावी.
advertisement
5/8
जास्त फीमुळे निर्माते त्यांना घेणार नाहीत, अशी त्यांची अपेक्षा होती. मात्र, नंतर त्यांनी चित्रपटातील एक सीन वाचला, जो त्यांना खूप आवडला आणि म्हणून त्यांनी ती भूमिका स्वीकारली.
advertisement
6/8
चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर आदिल हुसैन यांचा या भूमिकेकडे पाहण्याचा दृष्टिकोन पूर्णपणे बदलला. ते म्हणाले, "जेव्हा मी चित्रपट पाहिला, तेव्हा मला तो महिलाविरोधी वाटला. मी विचार केला, मी हे काय करून बसलो?"
advertisement
7/8
आदिल हुसैन यांनी स्पष्ट केले की, त्यांचा हा पश्चात्ताप वैयक्तिक होता, दिग्दर्शकाला उद्देशून नव्हता. ते म्हणाले, "ही माझी जबाबदारी होती. मला 'नाही' म्हणायला हवं होतं. माझ्या अनेक महिला मैत्रिणींनी निराशा व्यक्त केली होती. त्यामुळे मला त्या चित्रपटात काम केल्याचा खेद आहे, हे सांगणे आवश्यक होते."
advertisement
8/8
'कबीर सिंह' हा चित्रपट फक्त ५५ कोटी रुपयांच्या बजेटमध्ये बनला होता, पण त्याने भारतात नेट २७८.८० कोटी आणि जगभरात ३७७ कोटी रुपयांची जबरदस्त कमाई केली होती.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
'मी हे काय करून बसलो?' 377 कोटी कमावणारी फिल्म करून अभिनेत्याला होतोय पश्चात्ताप, म्हणतो...