राज ठाकरेंसाठी महेश मांजरेकरांनी नाकारली बाळासाहेबांची 'मातोश्री'वरील ती ऑफर, नेमकं काय घडलं होतं?
- Published by:Pratiksha Pednekar
Last Updated:
Mahesh Manjrekar : मैत्रीसाठी महेश मांजरेकरांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी दिलेली एक मोठी ऑफर कशी नाकारली, याचा किस्सा त्यांनी एका मुलाखतीत उघड केला आहे.
advertisement
1/10

मुंबई: दिग्दर्शक-अभिनेते महेश मांजरेकर आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या घट्ट मैत्रीची चर्चा राजकारण आणि कला क्षेत्रात नेहमीच असते.
advertisement
2/10
मात्र, याच मैत्रीसाठी मांजरेकरांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी दिलेली एक मोठी ऑफर कशी नाकारली, याचा किस्सा त्यांनी एका मुलाखतीत उघड केला आहे.
advertisement
3/10
बाळासाहेबांचे मांजरेकरांवर विशेष प्रेम होते. त्यांचा 'मी शिवाजीराजे भोसले बोलतोय' हा चित्रपट तर बाळासाहेबांना इतका आवडला होता की, त्यांनी तो ७० वेळा पाहिला होता! मांजरेकर त्यांच्या भेटीला कधीही गेले तरी बाळासाहेब त्यांना ही डीव्हीडी दाखवायचे.
advertisement
4/10
असाच एक दिवस, रात्रीच्या वेळी मांजरेकर 'मातोश्री'वर बाळासाहेबांना भेटायला गेले असताना, बाळासाहेबांनी त्यांना थेट विचारले, "तू मला शिवसेनेत हवा आहेस!"
advertisement
5/10
बाळासाहेबांनी लगेच त्यांना विक्रोळीतील एका सभेसाठी उपस्थित राहण्यास सांगितले. ही अनपेक्षित आणि मोठी ऑफर ऐकून मांजरेकरांचे पाय थरथरू लागले.
advertisement
6/10
बाळासाहेबांनी ही ऑफर देताच मांजरेकरांनी क्षणभरही न थांबता नम्रपणे नकार देण्याचा धाडसी निर्णय घेतला. मांजरेकर म्हणाले, "मी त्यांना घाबरत घाबरत बोललो... नाही हो, मी राज ठाकरेचा मित्र आहे. मी कसा जाऊ?"
advertisement
7/10
मांजरेकरांच्या या निर्णयाने राजकारणापेक्षा मैत्रीला दिलेले महत्त्व अधोरेखित झाले. मांजरेकर तिथून बाहेर पडले, तेव्हा लगेच त्यांना राज ठाकरेंचा फोन आला, पण मातोश्रीसमोर तेव्हा माझे इतर काही मित्रही बरोबर होते म्हणून त्यांनी राज ठाकरे यांचा फोन उचलला नाही.
advertisement
8/10
मांजरेकर सांगतात, "राज माझा खूप चांगला मित्र आहे, त्याच्याशी मैत्री असताना मी दुसऱ्या पक्षात कसा जाऊ?" या गडबडीनंतर त्यांनी घरी आल्यावर फोन बंद ठेवला होता आणि ते झोपून गेले. तीन दिवस तरी त्यांचा फोन बंद होता.
advertisement
9/10
मांजरेकर यांनी राज ठाकरे यांच्याबद्दल बोलताना सांगितले आहे की, “राजसारखा मित्र कुठेही भेटणार नाही. अडचणीच्या काळात तो मदतीसाठी नेहमी तयार असतो. माझ्यापासून एक फोन लांब असलेली व्यक्ती म्हणजे राज ठाकरे. तो खऱ्या अर्थाने दिलदार मनाचा माणूस आहे. मी त्याला राजा म्हणतो आणि त्याने तेवढा हक्क मला दिला आहे.”
advertisement
10/10
सध्या महेश मांजरेकर त्यांच्या 'पुन्हा शिवाजीराजे भोसले' या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहेत, जो ३१ ऑक्टोबरला प्रदर्शित होत आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
राज ठाकरेंसाठी महेश मांजरेकरांनी नाकारली बाळासाहेबांची 'मातोश्री'वरील ती ऑफर, नेमकं काय घडलं होतं?