TRENDING:

लग्नाला 25 वर्षे, 2 मुलांचा बाप! वयाच्या 58 व्या वर्षी अक्षय कुमारचा 26 वर्षे लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स, झाला ट्रोल

Last Updated:
Akshay Kumar Wamiqa Gabbi : अभिनेता अक्षय कुमार वयाच्या 58 व्या वर्षी 32 वर्षांच्या अभिनेत्रीसोबत रोमान्स करताना दिसला आणि सोशल मीडियावर ट्रोल झाला आहे.
advertisement
1/7
लग्नाला 25 वर्षे, 2 मुलांचा बाप! वयाच्या 58 व्या वर्षी अक्षय कुमारचा 26 वर्षे लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स, झाला ट्रोल
बॉलिवूडच्या बेस्ट कपलपैकी एक असलेलं कपल म्हणजे अक्षय कुमार आणि ट्विंकल खन्ना. त्यांच्या लग्नाला 25 वर्षे झाली आहेत. कपलला दोन मुलं आहेत. अक्षय कुमार आता 58 वर्षांचा आहे आणि या वयात तो एका 26 वर्षीय अभिनेत्रीसोबत रोमान्स करताना दिसला, त्यामुळे ट्रोल झाला आहे.
advertisement
2/7
अभिनेता आणि अभिनेत्री यांच्या वयातील अंतर हा बॉलीवूडमध्ये गेल्या काही काळापासून चर्चेचा विषय आहे. आता अक्षय कुमारही 26 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स करताना दिसला. ही अभिनेत्री आहे, वामिका गब्बी.
advertisement
3/7
अक्षय कुमार बऱ्याच कालावधीनंतर फिल्मद्वारे पडद्यावर परत येत आहे. त्याची हॉरर कॉमेडी फिल्म भूत बंगला 10 एप्रिल रोजी रिलीज होणार आहे. या फिल्ममध्ये त्याची अभिनेत्री 26 वर्षे लहान आहे. वामिका गब्बी असं तिचं नाव. 
advertisement
4/7
या फिल्ममधील एक गाणं प्रदर्शित झालं, ज्यामध्ये अक्षय आणि वामिकाची रोमँटिक केमिस्ट्री दाखवण्यात आली आहे. यानंतर  अक्षय-वामिकाची जोडी आणि वयातील अंतरामुळे प्रश्न उपस्थित झाले आहेत. आपल्यापेक्षा 26 वर्षांनी लहान असलेल्या वामिकासोबत रोमान्स केल्यामुळे अक्षय कुमारला ट्रोल केलं जात आहे.
advertisement
5/7
फिल्मचे दिग्दर्शक प्रियदर्शन यांच्या मते, प्रेक्षकांनी कलाकारांना त्यांच्या पात्रांच्या रूपात पाहिले पाहिजे. एमजीआर आणि एनटीआर यांच्यासारखे लोक म्हणायचे की, वास्तविक वय आणि पडद्यावरील वय यात खूप फरक असतो. कलाकाराचे पडद्यावरील वय हे त्याचं वास्तविक वय नसतं, पण लोक तुम्हाला तुमच्या पडद्यावरील वयामुळे स्वीकारतात. मला त्यात काही अडचण दिसत नाही."
advertisement
6/7
दरम्यान आता अक्षय कुमारने आपलं मौन सोडत ट्रोलर्सना उत्तर दिलं आहे. न्यूज18 शी बोलताना अक्षय कुमार म्हणाला, "मग काय झालं? आपण हे याआधी पाहिले नाही का? हॉलिवूडमध्येही असं घडतं. कधीकधी ही कथेची गरज असते. (खऱ्या आयुष्यातही) अनेक लोक स्वतःपेक्षा वयाने मोठ्या किंवा लहान असलेल्या पार्टनरशी लग्न करतात."
advertisement
7/7
याआधी अक्षय कुमारची पत्नी ट्विंकल खन्नाने 2025 मध्ये तिच्या 'टू मच विथ ट्विंकल अँड काजोल' या टॉक शोमध्ये अभिनेत्याचा कमी वयाच्या अभिनेत्रीसोबत रोमान्स याबाबत प्रश्न उपस्थित केले होते. मात्र शोचे गेस्ट आमिर खान आणि सलमान खान यांनी हलक्याफुलक्या उत्तरांनी हे प्रश्न झटकून टाकले.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
लग्नाला 25 वर्षे, 2 मुलांचा बाप! वयाच्या 58 व्या वर्षी अक्षय कुमारचा 26 वर्षे लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स, झाला ट्रोल
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल