TRENDING:

'त्याने ओठांवर ओठ ठेवत शर्ट...'; बॉलिवूड अभिनेत्री कास्टिंग काऊचची शिकार, सांगितला भयंकर अनुभव

Last Updated:
Bollywood Actress Casting Couch : बॉलिवूड अभिनेत्री नुकतंच कास्टिंग काऊचची शिकार झाल्याचा भीतीदायक अनुभव चाहत्यांसोबत शेअर केला आहे. कास्टिंग दिग्दर्शकाने अभिनेत्रीसोबत गैरवर्तन केले होते.
advertisement
1/7
'त्याने ओठांवर ओठ ठेवत शर्ट...'; बॉलिवूड अभिनेत्री कास्टिंग काऊचची शिकार
बॉलिवूड इंडस्ट्रीतील अनेक अभिनेत्री आजवर कास्टिंग काऊचच्या शिकार झाल्या आहेत. अशातच नुकतंच एका अभिनेत्रीने कास्टिंग काऊचबाबतचा तिचा भीतीदायक अनुभव चाहत्यांसोबत शेअर केला आहे. त्यामुळे चाहत्यांनाही मोठा धक्का बसलाय. कास्टिंग दिग्दर्शकाने अभिनेत्रीला कारमध्ये बसवून तिच्यासोबत जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला होता.
advertisement
2/7
बॉलिवूड अभिनेत्री आणि कंटेंट क्रिएटर डॉली सिंहने नुकताच आपला कास्टिंग काऊचचा अनुभव चाहत्यांसोबत शेअर केला. वयाच्या 19 व्या वर्षी डॉलीसोबत कास्टिंग दिग्दर्शकाने गैरवर्तन केलं होतं.
advertisement
3/7
'थँक यू फॉर कमिंग' आणि 'डबल एक्सएल' यांसारख्या चित्रपटांत झळकलेल्या डॉली सिंहला सोशल मीडियावर चांगलीच लोकप्रियता मिळाली. आता 'Zoom'ला दिलेल्या मुलाखतीत अभिनेत्रीने आपल्या कास्टिंग काऊचच्या अनुभवावर भाष्य केलं आहे.
advertisement
4/7
डॉली सिंह म्हणाली,"मला अभिनयाची आवड असल्याने माझा दिल्लीत मनोरंजनसृष्टीत स्ट्रगल सुरू होता. त्यावेळी एक कास्टिंग दिग्दर्शक माझ्या संपर्कात आला".
advertisement
5/7
डॉली सिंह पुढे म्हणाली,"जेव्हा तुम्ही नवीन असता तेव्हा तुम्हाला बोलावं लागतं. नाहीतर समोरच्या व्यक्तीला वाटतं की तुम्हाला कामात रस नाही. एक स्त्री म्हणून जेव्हा एखादा पुरुष तुम्हाला काही ऑफर देतो, तेव्हा ते खूप गोंधळात टाकणारं असतं. तुम्ही समजू शकत नाही की तो तुमच्या टॅलेंटसाठी बोलतोय की तुमच्यासोबत बोलण्यामागे त्याचा काही दुसरा हेतू आहे".
advertisement
6/7
कास्टिंग काऊचबाबत बोलताना डॉली म्हणाली,"माझ्या संपर्कात आलेला कास्टिंग दिग्दर्शक मला फोन करायचा. ऑडिशनबाबतीत बोलायचा. मला म्हणायचा की, एका निर्मात्याला तो मला भेटवणार असल्याचंही सांगायचा. त्यासाठी त्याने मला दिल्लीत एका 5-स्टार हॉटेलमध्ये बोलावलं होतं. निर्मात्यासोबत मीटिंग झाल्यानंतर मी त्या कास्टिंग दिग्दर्शकाच्या गाडीत बसले. आम्ही निर्मात्याची परत येण्याची वाट पाहत होते. तेव्हा अचानक त्या कास्टिंग दिग्दर्शकाने माझ्या ओठांवर आपले ओठ ठेवले आणि माझं शर्ट काढायला सुरुवात केली. त्यावेळी मी हैराण झाले होते. काय करावं काय नाही काही सुचत नव्हतं".
advertisement
7/7
डॉली कास्टिंग काऊचची शिकार झाली त्यावेळी तिचं वय 19 होतं. तर कास्टिंग दिग्दर्शक सुमारे 35 ते 40 वर्षांचा होता. डॉली म्हणाली,"त्यावेळी मी त्या कास्टिंग दिग्दर्शकाला दूर ढकललं पण काही बोलू शकले नाही. ना पळून जाऊ शकले. त्यावेळी मी फक्त त्या माणसापासून माझी लवकरात लवकर सुटका व्हावी यासाठी देवाकडे प्रार्थना करत होते".
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
'त्याने ओठांवर ओठ ठेवत शर्ट...'; बॉलिवूड अभिनेत्री कास्टिंग काऊचची शिकार, सांगितला भयंकर अनुभव
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल