TRENDING:

सलमानची हिरोईन, 14 वर्षे एक्टिंगपासून दूर; तरीही 2000 कोटींची मालकीण, जगतेय लॅविश आयुष्य

Last Updated:
सलमान खानसोबत हिट सिनेमात काम करणारी बॉलिवूडची फेमस अभिनेत्री अनेक वर्ष इंडस्ट्रीपासून दूर आहे. असं असलं तरी ती आता लॅविश आयुष्य जगतेय. ती 2000 कोटींची मालकीण आहे.
advertisement
1/8
सलमानची हिरोईन, 14 वर्षे एक्टिंगपासून दूर; तरीही 2000 कोटींची मालकीण
गोविंदा, सलमान खान, सुनील शेट्टी, चिरंजीवी आणि बालकृष्ण यांसारख्या दिग्गजांसोबत काम करणाऱ्या या अभिनेत्री बॉलिवूड तसंच साऊथ फिल्ममध्येही काम केलं आहे. तिच्या कारकिर्दीच्या सुरुवातीलाच तिने अनेक सुपरहिट आणि ब्लॉकबस्टर सिनेमात काम केलं. 90 च्या दशकातील आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक असलेली ही अभिनेत्री 14 सिनेसृष्टीपासून दूर आहे. असं असलं तरी तिच्याकडे अमाप संपत्ती असून लग्झरी आयुष्य जगतेय.
advertisement
2/8
'जुडवा', 'बंधन', 'हिटलर' आणि 'क्योंकी मैं झूट नहीं बोलता' सारख्या सुपरहिट सिनेमांमध्ये काम करणाऱ्या या अभिनेत्रीचं नाव आहे रंभा. करिअर यशावर शिखरावर असताना रंभाने लग्न केलं आणि सिनेसृष्टी सोडली. तिने बॉलिवूडसह तमिळ, तेलगू आणि मल्याळम सिनेमांतही काम केले आहे.
advertisement
3/8
गोविंदासोबत हिट फिल्म करणारी ही रंभा आहे कॅनडामध्ये तिच्या फॅमिलीसोबत राहते. तिचा बिझनेस आहे. रंभा अभिनय काम करत होते तेव्हा ती जेव्हा जेव्हा रुपेरी पडद्यावर यायची तेव्हा थिएटरमध्ये टाळ्या आणि शिट्ट्यांचा कडकडाट व्हायचा.
advertisement
4/8
साऊथ सिनेमांपासून ते बॉलिवूडपर्यंत अनेक सिनेमांत काम करून रंभाने  तिच्या ग्लॅमर आणि अभिनयाच्या प्रेक्षकांची मनं जिंकली. चिरंजीवी, रजनीकांत आणि सलमान खान सारख्या मोठ्या स्टार्ससोबत काम करणारी ही अभिनेत्री लग्नानंतर चित्रपटांपासून दूर गेली. तिचा नवरा 2000 कोटींचा मालक आहे.
advertisement
5/8
रंभा हे तिचं सिनेमातील नाव आहे. तिचं खरं नाव हे विजयालक्ष्मी आहे. रंभाने 1992 साली मल्याळम संगीत नाटक 'सरगम'मधून तिच्या कामाला सुरुवात केली. . मल्याळम भाषा येत नसतानाही तिने तिच्या अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकली. या सिनेमाला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला.
advertisement
6/8
1992 मध्ये राजेंद्र प्रसाद यांच्यासोबत 'आ ओक्काठी अडक्कू' या सिनेमातून तेलुगू सिनेमात तिने पदार्पण केलं. हा सिनेमा सुपरहिट ठरला. या सिनेमामुळे तिला रंभा हे नाव पडलं.  रंभाने टॉलीवूडमध्ये चिरंजीवी, बालकृष्ण, वेंकटेश, कृष्णा आणि जगपती बाबू सारख्या स्टार हिरोंसोबत काम केलंय.
advertisement
7/8
दक्षिणेत नाव कमावत असताना  रंभाने बॉलिवूडमध्ये प्रवेश केला. 1995 मध्ये तिने मिथुन चक्रवर्तीसोबत 'जल्लाद' चित्रपटात काम केले. त्यानंतर तिने अनिल कपूर, गोविंदा आणि सुनील शेट्टी सारख्या टॉप स्टार्ससोबत काम केले. सलमान खानसोबतचे तिचे चित्रपट रंभाच्या कारकिर्दीचे महत्त्वाचे चित्रपट होते.
advertisement
8/8
डेव्हिड धवनचा 'जुडवा' या कॉमेडी सिनेमात होती. 'बंधन' सारख्या रोमँटीक सिनेमात तिने काम केलं. तिने तेलुगू, तमिळ, मल्याळम, हिंदी आणि कन्नडसह आठ भाषांमधील शंभराहून अधिक सिनेमात तिने काम केलं आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
सलमानची हिरोईन, 14 वर्षे एक्टिंगपासून दूर; तरीही 2000 कोटींची मालकीण, जगतेय लॅविश आयुष्य
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल