TRENDING:

ShaniDev 2026: बिग गुडन्यूज! वर्ष 2026 मध्ये शनिदेव या राशींच्या लोकांवर मेहरबान; हाताला यश देणार

Last Updated:
ShaniDev 2026: ज्योतिषशास्त्रात शनिदेवाचे खूप महत्त्वाचे स्थान आहे. त्यांना न्याय, कर्म, अनुशासन आणि परीक्षेचे देवता मानलं जातं. शनि ग्रहाला ज्योतिषामध्ये कर्मफळ देणारा (कर्मफल दाता) म्हटलं जातं. शनी व्यक्तीच्या कर्मानुसार फळ देतो. 2026 मध्ये शनिदेव मीन राशीत विराजमान असतील आणि या स्थितीचा प्रत्येक राशीवर वेगवेगळा परिणाम दिसेल.
advertisement
1/7
बिग गुडन्यूज! वर्ष 2026 मध्ये शनिदेव या राशींच्या लोकांवर मेहरबान; हाताला यश
शनिला कर्मफळ आणि अनुशासनाचे देवता मानलं जातं, त्यांचा गंभीर आणि न्यायपूर्ण प्रभाव जीवनात स्थिरता, मेहनत आणि परिपक्वता घेऊन येतो. मीन राशीत असल्यामुळे शनीचा प्रभाव सहनशीलता, विवेक आणि आध्यात्मिक विकासाकडे अधिक वाढेल. २०२६ मध्ये कोणत्या राशींवर शनिदेवाची विशेष कृपा राहील, ते जाणून घेऊया.
advertisement
2/7
शनिला कर्मफळ आणि अनुशासनाचे देवता मानलं जातं, त्यांचा गंभीर आणि न्यायपूर्ण प्रभाव जीवनात स्थिरता, मेहनत आणि परिपक्वता घेऊन येतो. मीन राशीत असल्यामुळे शनीचा प्रभाव सहनशीलता, विवेक आणि आध्यात्मिक विकासाकडे अधिक वाढेल. २०२६ मध्ये कोणत्या राशींवर शनिदेवाची विशेष कृपा राहील, ते जाणून घेऊया.
advertisement
3/7
वृषभ राशी - वृषभ राशीच्या लोकांसाठी हा काळ सहनशीलता, परिश्रम आणि कर्मफळाच्या दिशेने निर्णायक ठरेल. शनि वृषभ राशीच्या लोकांच्या जीवनात कष्ट आणि मेहनतीनंतरही स्थिर यश घेऊन येतील. शनीच्या प्रभावामुळे दीर्घकाळ थांबलेली कामे किंवा व्यावसायिक अडथळे हळूहळू दूर होतील. मेहनत आणि शिस्तीनं कायमस्वरूपी आणि मजबूत यश मिळू शकते.
advertisement
4/7
वृषभेच्या आर्थिक बाबींमध्ये सुधारणा होईल, पण घाईगर्दी किंवा अविवेकी गुंतवणुकीपासून लांब राहावे. शनीच्या कृपेने आर्थिक मजबुती वाढेल. कुटुंब आणि मित्रांसोबतच्या नात्यात संयम आणि समजुतीने स्थिरता येईल. जुन्या वादाचे किंवा गैरसमजाचे निराकरण होऊ शकते.
advertisement
5/7
सिंह राशी - २०२६ मध्ये शनिदेव सिंह राशीला अडीचकीच्या फेऱ्यात ठेवतील. याचा अर्थ असा की, सिंह राशीच्या लोकांसाठी काही क्षेत्रांमध्ये अडथळे, विलंब आणि अडचणी वाढू शकतात. शनीच्या अडीचमुळे कार्य, आरोग्य आणि संबंधांमध्ये वेळोवेळी आव्हाने येऊ शकतात. अडचणी आणि विलंब असूनही, जे लोक मेहनत आणि प्रामाणिकपणाने काम करतील, त्यांना दीर्घकालीन यश आणि स्थिर परिणाम मिळतील. शनीची ही स्थिती अशा लोकांना संयम, अनुशासन आणि धैर्य शिकवते, जे भविष्यात फायदेशीर ठरेल. आर्थिक निर्णयांमध्ये संयम ठेवल्यास कायमस्वरूपी आर्थिक सुरक्षा मिळेल.
advertisement
6/7
तूळ राशी - तूळ राशीच्या लोकांसाठी हा काळ धैर्य, मेहनत आणि कर्मफळाच्या दिशेने महत्त्वाचा ठरेल. शनि त्यांच्या शिस्त आणि न्यायाच्या प्रभावाने तूळ राशीच्या लोकांच्या जीवनात स्थिरता आणि दीर्घकालीन लाभ आणतील. दीर्घकाळ केलेल्या प्रयत्नांमुळे धनवृद्धी होईल.
advertisement
7/7
कुंभ राशी - कुंभ राशीवर शनीच्या साडेसातीचा अंतिम टप्पा सुरू आहे. २०२६ त्यांच्यासाठी यश, लाभ आणि आर्थिक उन्नती घेऊन येईल. कुंभ राशीच्या लोकांना त्यांच्या मेहनतीचे फळ मिळेल. थांबलेली कामे पूर्ण होतील. शनिदेवाच्या कृपेने नात्यांमध्ये स्थिरता येईल. तसेच, आव्हानांचा सामना करण्याची क्षमता वाढेल.(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/राशीभविष्य/
ShaniDev 2026: बिग गुडन्यूज! वर्ष 2026 मध्ये शनिदेव या राशींच्या लोकांवर मेहरबान; हाताला यश देणार
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल