TRENDING:

ना करिश्मा, ना राणी, ना ऐश्वर्या; या हिरोईनच्या मागे वेडा होता अभिषेक बच्चन, डायरेक्ट विचारलं 'माझ्यासोबत झोपता का?'

Last Updated:
ऐश्वर्या राय सोबत विवाह करण्यापूर्वी अभिषेकचे नाव अभिनेत्री राणी मुखर्जी आणि करिश्मा कपूर यांच्याशी जोडले गेले होते. मात्र, एका मोठ्या अभिनेत्रीवर त्याचे पहिले आणि खूप प्रेम होते.
advertisement
1/7
ना करिश्मा, ना राणी, ना ऐश्वर्या; 'या' हिरोईनच्या मागे वेडा होता अभिषेक बच्चन
मुंबई: चित्रपटसृष्टीतील शांत आणि मनमिळाऊ स्वभाव असणारा अभिनेता म्हणजे अभिषेक बच्चन. प्रसिद्ध अभिनेते अमिताभ बच्चन यांचा मुलगा असल्यामुळे अभिषेकला लहानपणापासूनच चित्रपटाच्या सेटवर वावरण्याचा अनुभव मिळाला. यामुळे अनेक सुपरस्टार्सशी त्याचे जवळचे संबंध आले.
advertisement
2/7
मोठेपणी ऐश्वर्या राय सोबत विवाह करण्यापूर्वी अभिषेकचे नाव अभिनेत्री राणी मुखर्जी आणि करिश्मा कपूर यांच्याशी जोडले गेले होते. मात्र, एका मोठ्या अभिनेत्रीवर त्याचे पहिले आणि खूप प्रेम होते आणि एकदा त्याने तिला थेट विचारले होते, "मी तुमच्यासोबत झोपू का?"
advertisement
3/7
कोण होती ही अभिनेत्री, जिच्यावर अभिषेकचे इतके प्रेम होते? खुद्द ज्युनियर बच्चनने एका दूरचित्रवाणीवरील कार्यक्रमात आपल्या आयुष्यातील या पहिल्या प्रेमाचे गुपित उघड केले.
advertisement
4/7
'यारों की बारात' या कार्यक्रमात बोलताना अभिषेकने सांगितले की, १९८३ मध्ये आलेल्या 'महान' या चित्रपटाचे शूटिंग नेपाळमधील काठमांडू येथे सुरू होते. तो वडिलांसोबत तिथे गेला होता आणि सगळ्या कलाकारांसोबत खूप मजा करत असे. अभिषेकने सांगितले की, या चित्रपटात अभिनेत्री झीनत अमान मुख्य भूमिकेत होत्या आणि त्याच माझे पहिले प्रेम होत्या!
advertisement
5/7
एक दिवस चित्रीकरण संपल्यानंतर सगळे रात्रीचे जेवण करून आपापल्या खोल्यांमध्ये जाण्यासाठी निघाले. तेव्हा झीनत अमान यांना जाताना पाहून लहानग्या अभिषेकने त्यांना विचारले, "झीनत मावशी, तुम्ही कुठे जात आहात?"
advertisement
6/7
त्यांनी उत्तर दिले, "खोलीत झोपायला जात आहे." यावर अभिषेकने निरागसतेने विचारले, "तुम्ही एकट्या झोपता?" झीनत यांनी 'हो' म्हणताच, एकटं झोपायची सवय नसल्याने अभिषेकने लगेचच त्यांना विचारले, "मी तुमच्यासोबत झोपू का?"
advertisement
7/7
अभिषेकचा हा प्रश्न ऐकून झीनत अमानही चकित झाल्या. त्यांनी अभिषेकला हसत उत्तर दिले, "आधी थोडे मोठे व्हा, मग झोपा!" अभिषेकने हा मजेदार किस्सा सांगताच कार्यक्रमात उपस्थित असलेले संजय दत्त, अजय देवगण आणि रितेश देशमुख यांसारख्या कलाकारांनी हसून दाद दिली.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
ना करिश्मा, ना राणी, ना ऐश्वर्या; या हिरोईनच्या मागे वेडा होता अभिषेक बच्चन, डायरेक्ट विचारलं 'माझ्यासोबत झोपता का?'
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल