TRENDING:

दीपिका-कतरिनालाही चारली धूळ, फराह खानने सांगितलं कोण आहे अल्टीमेट दिवा? उत्तर ऐकून पोट धरून हसाल

Last Updated:
Farah Khan : फराह खानने आजवर अनेक ग्लॅमरस अभिनेत्रींसोबत काम केले आहे. या सगळ्या दिवा कलाकारांमध्ये सर्वात मोठी दिवा कोण आहे, असा प्रश्न विचारल्यावर फराहने दिलेले उत्तर ऐकून तुम्हालाही हसू आवरणार नाही.
advertisement
1/8
दीपिका-कतरिनालाही चारली धूळ, फराह खानने सांगितलं कोण आहे अल्टीमेट दिवा?
मुंबई: बॉलिवूडच्या सर्वात यशस्वी दिग्दर्शिका आणि कोरिओग्राफर फराह खानने आजवर दीपिका पदुकोण, कतरिना कैफ, सुष्मिता सेन अशा अनेक ग्लॅमरस अभिनेत्रींसोबत काम केले आहे. पण, या सगळ्या दिवा कलाकारांमध्ये सर्वात मोठी दिवा कोण आहे, असा प्रश्न विचारल्यावर फराहने दिलेले उत्तर ऐकून तुम्हालाही हसू आवरणार नाही.
advertisement
2/8
टेनिस स्टार सानिया मिर्झाच्या 'सर्व्हिंग इट अप विथ सानिया मिर्झा' या पॉडकास्टमध्ये फराह खानने हा गंमतशीर खुलासा केला. फराहला विचारण्यात आले की, तिने काम केलेल्या कलाकारांमध्ये सर्वात जास्त नखरे कोण करतं? यावर फराह मोठ्याने हसली.
advertisement
3/8
फराह म्हणाली, "तो नक्कीच दिलीप असणार. मला तुम्हाला सांगायचे आहे की, तो लवकर जागेवरून उठूच शकत नाही. तो म्हणतो, 'मला शूटिंगला जायचे आहे आणि मी स्वयंपाकही करतोय, मला डिस्टर्ब करू नका!' तो आता खरंच दिवा बनला आहे." फराह खानच्या या उत्तराने सानिया मिर्झा पोट धरून हसली.
advertisement
4/8
फराहने 'ओम शांती ओम', 'हॅप्पी न्यू इअर' आणि 'तीस मार खान' यांसारख्या हिट चित्रपटांचे दिग्दर्शन केले आहे, तसेच 'छैंया छैंया' आणि 'कुछ कुछ होता है' सारखी आयकॉनिक गाणी कोरिओग्राफ केली आहेत. यावेळी तिने बॉलिवूडच्या पॉप्यूलर हिरोईन्ससोबत काम केले.
advertisement
5/8
तरीही, फराहने कबूल केले की, दिलीपसोबत तिचे जे यूट्युब व्लॉग्स आहेत, त्यातून तिने मोठ्या पडद्यावरील चित्रपटांपेक्षा जास्त कमाई केली आहे. फराह म्हणाली, "सध्या कंटेंट क्रिएशनमध्ये खूप पैसे आहेत. मी कंटेंट बनवून सर्वाधिक कमाई केली आहे, पण तरीही मला निवड करायची झाल्यास मी दिग्दर्शनालाच प्राधान्य देईन."
advertisement
6/8
ती पुढे म्हणाली की, सुरुवातीला तिने दिलीपला आपल्या रेसिपी शिकवल्या, पण आता तो इतका प्रो झाला आहे की, त्याला कोणतीही रेसिपी सांगितल्यास तो सहज बनवू शकतो.
advertisement
7/8
फराह आणि दिलीपची जोडी २०२४ मध्ये कुकिंग व्लॉगमुळे व्हायरल सेन्सेशन बनली. फराह त्याच्या लोकप्रियतेमुळे त्याला प्रत्येक व्हिडिओसाठी कमिशन देते, इतकेच नव्हे तर त्याचा पगारही तिने वाढवला आहे.
advertisement
8/8
फराहने अभिमानाने सांगितले की, तिने दिलीपच्या मुलांना इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये चांगल्या शिक्षणासाठी मदत केली आहे. "त्यांच्या एका मुलाला मी कलिनरी डिप्लोमा करण्यासाठी मदत केली, जेणेकरून तो घरगुती कामांऐवजी चांगल्या हॉटेल किंवा रेस्टॉरंटमध्ये काम करू शकेल," असे तिने सांगितले.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
दीपिका-कतरिनालाही चारली धूळ, फराह खानने सांगितलं कोण आहे अल्टीमेट दिवा? उत्तर ऐकून पोट धरून हसाल
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल