रेप सीन शूट करताना अभिनेत्याने ओलांडल्या सीमा, संतापलेल्या अभिनेत्रीने उतरवला माज, सर्वांसमोरच केलं असं काही...
- Published by:Pratiksha Pednekar
Last Updated:
Bollywood Controversy : पडद्यावर अत्यंत सहज वाटणारे रेप सीन्स प्रत्यक्षात साकारणे कलाकारांसाठी नेहमीच आव्हानपूर्ण असते. अनेकदा हे सीन शूट करताना मोठी कसरत करावी लागते.
advertisement
1/8

मुंबई: आजकाल फिल्म्स आणि वेबसीरिजमध्ये सर्रास इंटिमेट किंवा रेप सीन दाखवले जातात. मात्र, पडद्यावर अत्यंत सहज वाटणारे हे सीन्स प्रत्यक्षात साकारणे कलाकारांसाठी नेहमीच आव्हानपूर्ण असते. अनेकदा हे सीन शूट करताना मोठी कसरत करावी लागते.
advertisement
2/8
मात्र, एका प्रसिद्ध अभिनेत्रीसोबत असा एक प्रसंग घडला, ज्यामुळे अभिनेत्रीला मोठा धक्का बसला होता. अनेक दशके सिनेसृष्टीत या सीनची चर्चा रंगली. एका अभिनेत्याचा रेप सीन शूट करताना स्वत:वरचा ताबा सुटला. अशावेळी संतापलेल्या अभिनेत्रीने त्याच्या जोरदार कानशिलात लगावली.
advertisement
3/8
ही अभिनेत्री आहे जया प्रदा आणि ज्या अभिनेत्याबद्दल ही चर्चा झाली, ते म्हणजे पडद्यावरील अनेक खलनायकी भूमिका साकारलेले दिलीप ताहिल. १९८० मध्ये आलेल्या 'शान' या चित्रपटात जया प्रदा आणि दलीप ताहिल यांनी एकत्र काम केले होते.
advertisement
4/8
याच चित्रपटातील एका रेप सीनच्या शूटिंगदरम्यान दलीप ताहिल यांचा स्वत:वरचा ताबा सुटला आणि ते सीनमध्ये इतके वाहत गेले की, त्यांच्या कृतीने जया प्रदा यांना अस्वस्थ वाटले.
advertisement
5/8
असे सांगितले जाते की, दलीप ताहिल यांच्या या वागण्याने संतापून जया प्रदा यांनी त्यांच्या जोरदार कानशिलात लगावली होती. या घटनेनंतर काही काळ शूटिंग थांबले होते आणि निर्मात्यांनी खूप समजावल्यानंतर जया प्रदा शूटिंगसाठी तयार झाल्या आणि चित्रपट पूर्ण झाला.
advertisement
6/8
ही घटना अनेक वर्षे सिनेसृष्टीत चर्चेत राहिली असली, तरी गेल्या वर्षी या प्रकरणाला नवीन वळण मिळाले. अभिनेता दलीप ताहिल यांनी एका मुलाखतीत हा किस्सा पूर्णपणे चुकीचा असल्याचे स्पष्ट केले.
advertisement
7/8
सिद्धार्थ कन्ननला दिलेल्या मुलाखतीत दलीप ताहिल म्हणाले, "मी हे स्पष्ट करू इच्छितो की मी जया प्रदा यांच्यासोबत कधीही काम केलेले नाही. मला त्यांच्यासोबत काम करायची खूप इच्छा होती, पण ते शक्य झाले नाही." दलीप ताहिल यांनी १९७४ मध्ये 'अंकुर' चित्रपटातून पदार्पण करण्यापूर्वी बराच काळ नाटकात काम केले होते.
advertisement
8/8
जया प्रदा आणि दलीप ताहिल यांनी कधी एकत्र काम केले नाही, या दलीप ताहिलच्या दाव्यामुळे, कानशिलात लगावल्याची ही घटना खरी की केवळ अफवा होती, हे गूढ कायम राहिले आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
रेप सीन शूट करताना अभिनेत्याने ओलांडल्या सीमा, संतापलेल्या अभिनेत्रीने उतरवला माज, सर्वांसमोरच केलं असं काही...