तांत्रिकाच्या जाळ्यात फसले होते महेश भट्ट, फायनान्सरला खाऊ घातलं माणसाचं मांस, काय आहे प्रकरण?
- Published by:Pratiksha Pednekar
Last Updated:
Mahesh Bhatt : महेश भट्ट संघर्षाच्या काळात एका तांत्रिकाच्या सांगण्यावरून कथितरित्या एका फायनान्सरला माणसाचं मांस खाऊ घालण्याचा प्रयत्न केला होता.
advertisement
1/8

मुंबई: बॉलिवूडचे वादग्रस्त आणि स्पष्टवक्ते दिग्दर्शक महेश भट्ट यांचं आयुष्य नेहमीच चढ-उतारांनी भरलेलं राहिलं आहे. सुरुवातीच्या अपयशानंतर त्यांनी आपल्या खासगी आयुष्यावर आधारित चित्रपट बनवून लोकप्रियता मिळवली.
advertisement
2/8
मात्र, आता त्यांनी मुलगी पूजा भट्टच्या पॉडकास्टमध्ये एक अत्यंत हादरवणारा आणि अविश्वसनीय खुलासा केला आहे. संघर्षाच्या काळात एका तांत्रिकाच्या सांगण्यावरून त्यांनी कथितरित्या एका फायनान्सरला माणसाचं मांस खाऊ घालण्याचा प्रयत्न केला होता.
advertisement
3/8
पूजा भट्टच्या नवीन पॉडकास्ट ‘द पूजा भट्ट शो’वर महेश भट्ट यांनी आपल्या जीवनातील एका विचित्र अध्यायाची आठवण सांगितली. ते म्हणाले, जेव्हा ते चित्रपट निर्माता म्हणून संघर्ष करत होते, तेव्हा मित्र अरुण देसाईने त्यांना बिहारच्या गया येथे एका फायनान्सरला भेटण्याची ऑफर दिली.
advertisement
4/8
अरुण देसाईने त्यांना वाराणसीच्या मार्गाने जायला सांगितले, कारण तिथे त्याचे गुरूजी राहत होते. महेश भट्ट म्हणाले, “तो तांत्रिक होता, एक तरुण माणूस, जो हातात रमची बाटली घेऊन नाचत असायचा.” तांत्रिकाला लगेच कळलं की महेश भट्टांचा त्याच्या तांत्रिक शक्तींवर विश्वास नाही.
advertisement
5/8
दुसऱ्या दिवशी महेश भट्ट तांत्रिकाला भेटायला गेले, तेव्हा तांत्रिकाने कपाटातून एका कागदात गुंडाळलेली वस्तू काढली. महेश आठवण करून सांगतात, “त्याने एक तुकडा काढला आणि त्याची पुडी बनवली. तो म्हणाला की हे घाटांवरून आणलेले माणसाचे मांस आहे. हे घेऊन जा आणि तुमच्या फायनान्सरला खाऊ घाला, म्हणजे तो तुम्हाला पैसे देईल.”
advertisement
6/8
मोठं यश मिळवण्याच्या आशेने महेश भट्ट ते मांस घेऊन गयाला पोहोचले. तिथे त्यांनी एका जमीनदाराला भेटले, जो मच्छरदाणीच्या मागे बसलेला असायचा आणि त्याच्या भोवती बंदूकधारी अंगरक्षक असायचे.
advertisement
7/8
भट्ट सांगतात, “आम्ही ठरवलं, एक पान खरेदी करायचं आणि त्यात हे मांस ठेवून त्याला द्यायचं.” दुसऱ्या दिवशी विनंती केल्यावर तो फायनान्सर पान खायला तयार झाला. "त्याने ते पान हळूच तोंडाजवळ आणले आणि चघळायला सुरुवात केली. आम्हाला वाटलं, आता आमचं काम झालं!"
advertisement
8/8
महेश भट्ट आनंदाने गयातून परतले, पण एका महिन्यानंतर त्यांना कळालं की, त्या कथित मानवी मांसामुळे फायनान्सरकडून कोणतीही आर्थिक मदत मिळाली नाही. आपल्या आयुष्यातील हा वेडेपणाचा टप्पा सांगताना महेश भट्ट स्वतःही अवाक झाले होते.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
तांत्रिकाच्या जाळ्यात फसले होते महेश भट्ट, फायनान्सरला खाऊ घातलं माणसाचं मांस, काय आहे प्रकरण?