TRENDING:

Guess Who: लग्न करुन आयुष्य झालं उद्ध्वस्त, दोन्ही पतींनी दिला त्रास; 44 व्या वर्षी अभिनेत्री जगतेय सिंगल आयुष्य

Last Updated:
Guess Who: टीव्हीची क्वीन जी अभिनयामुळे, तिच्या कामामुळे चर्चेत असते. सोशल मीडियावर तिच्या बोल्डनेसचे मोठे चाहते आहेत. याशिवाय तिचं वैयक्तिक आयुष्यही खूप चर्चेत राहिलं आहे.
advertisement
1/7
लग्न करुन आयुष्य झालं उद्ध्वस्त, दोन्ही पतींनी दिला त्रास; जगतेय सिंगल आयुष्य
टीव्हीची क्वीन जी अभिनयामुळे, तिच्या कामामुळे चर्चेत असते. सोशल मीडियावर तिच्या बोल्डनेसचे मोठे चाहते आहेत. याशिवाय तिचं वैयक्तिक आयुष्यही खूप चर्चेत राहिलं आहे.
advertisement
2/7
या अभिनेत्रीला प्रेमात खूप धोका मिळाला. दोन लग्न झाली मात्र एकही टिकू शकलंनाही आणि डिवोर्स झाला. पण तिनं हार मानली नाही. आरोप-प्रत्यारोपानंतरही ती आज खंबीरपणे एकटीच आयुष्य जगत आहे.
advertisement
3/7
आपण बोलत असलेली ही टीव्ही क्वीन आणि फिटनेस डिवा आहे अभिनेत्री श्वेता तिवारी. टीव्हीवर नेहमी हसतमुख दिसणारी अभिनेत्री श्वेता तिवारी हिचं खरं आयुष्य मात्र सिनेमासारखं नव्हतं. तुला खूप वाईट काळातून जावं लागलं.
advertisement
4/7
1998 साली, केवळ 19 वर्षांची असताना श्वेताने अभिनेता राजा चौधरीशी लग्न केलं. प्रेमविवाह पण संसार मात्र तितकासा गोड नव्हता. श्वेताने नंतर उघडपणे सांगितलं की नात्यात हिंसा आणि कटुता होती. त्यांच्या संसारात मुलगी पलक आली, पण त्यांचं लग्न तुटलं.
advertisement
5/7
या घटस्फोटात श्वेताने पोटगी न मागता, उलट आपल्या मुलीच्या ताब्यासाठी मोठी रक्कम दिली. समाजाने तिला दोष दिला, बिग बॉसच्या घरात तर डॉली बिंद्राने तिच्या वैयक्तिक आयुष्यावर थेट टोमणे मारले. पण श्वेताने गप्प न बसता धैर्याने सगळ्याला सामोरं गेलं.
advertisement
6/7
2013 मध्ये श्वेताने पुन्हा प्रेमावर विश्वास ठेवत अभिनव कोहलीशी लग्न केलं. लग्नानंतर मुलगा रेयांश झाला. पण या नात्यातही कटुता, वाद आणि आरोप आले. इतकंच नाही, अभिनवने तर श्वेताची प्रतिमा खराब करण्याचाही प्रयत्न केला. हे लग्नही मोडलं.
advertisement
7/7
दोन अपयशी लग्न, समाजाचे टोमणे, मीडियाचा दबाव... या सगळ्यातही श्वेता तिवारीने आई म्हणून सिंहिणीसारखी लढाई केली. कोणत्याही आधाराशिवाय दोन्ही मुलांना तिने स्वतःच्या जोरावर वाढवलं. आज पलक 24 वर्षांची आहे आणि बॉलीवूडमध्ये प्रवेश करत आहे, तर रेयांश अजून लहान आहे. आजही श्वेताचं नाव अनेकदा कुठल्या ना कुठल्या अभिनेत्याशी जोडलं जातं. पण ती प्रत्येक वेळी स्पष्ट सांगते – “मी अविवाहित आहे आणि माझी मुलं हेच माझं जग आहे.”
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
Guess Who: लग्न करुन आयुष्य झालं उद्ध्वस्त, दोन्ही पतींनी दिला त्रास; 44 व्या वर्षी अभिनेत्री जगतेय सिंगल आयुष्य
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल