Satish Shah Death : मृत्यूच्या वेळी सतीश शहांची बिकट अवस्था, मॅनेजरनेच सांगितलं शेवटच्या क्षणी नेमकं काय घडलं?
- Published by:Pratiksha Pednekar
Last Updated:
Satish Shah death : सतीश शाह यांच्या निधनाने बॉलिवूडवर शोककळा पसरली असताना, त्यांचे मॅनेजर रमेश कडातला यांनी त्यांच्या शेवटच्या क्षणांची हृदयद्रावक कहाणी सांगितली आहे.
advertisement
1/7

मुंबई: आपल्या हसतमुख चेहऱ्याने आणि दमदार विनोदाने प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण करणारे ज्येष्ठ अभिनेते सतीश शाह यांचे २५ ऑक्टोबर रोजी निधन झाले. वयाच्या ७४ व्या वर्षी किडनी निकामी झाल्यामुळे त्यांची प्राणज्योत मालवली.
advertisement
2/7
सतीश शाह यांच्या निधनाने बॉलिवूडवर शोककळा पसरली असताना, त्यांचे मॅनेजर रमेश कडातला यांनी त्यांच्या शेवटच्या क्षणांची हृदयद्रावक कहाणी सांगितली आहे.
advertisement
3/7
रमेश कडातला यांनी एका वृत्तसंस्थेशी बोलताना सतीश शाह यांच्या निधनापूर्वीच्या घटनांचाक्रम सांगितला. हा धक्कादायक प्रसंग दुपारच्या जेवणाच्या वेळी घडला. रमेश म्हणाले, "२५ ऑक्टोबरच्या दुपारी २ ते २.४५ च्या दरम्यानची ही घटना आहे. सतीश शाह जेवण करत होते. त्यांनी घास तोंडात घेतला आणि त्याच क्षणी अचानक ते खाली कोसळले आणि शुद्ध हरपली."
advertisement
4/7
हा प्रकार घडताच तातडीने हिंदुजा रुग्णालयात फोन करण्यात आला. मात्र, रमेश यांनी एक अत्यंत गंभीर बाब सांगितली, "अ‍ॅम्ब्युलन्स यायला जवळपास अर्धा तास लागला." इतका उशीर झाल्यामुळे परिस्थिती हाताबाहेर गेली. रुग्णालयात पोहोचताच डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
advertisement
5/7
या कठीण प्रसंगी सतीश शाह यांच्यासोबत उपस्थित असलेल्या त्यांच्या शेजारी अनूप यांनीही आपल्या आठवणी सांगितल्या. अनूप म्हणाले, "रमेशने बोलावताच मी तिथे धावलो. आम्ही सतीश काकांना वाचवण्यासाठी खूप प्रयत्न केले. ते खरंच मनाचे खूप चांगले माणूस होते. मी ज्या ज्या लोकांना मदतीसाठी बोलावले, ते सर्वजण आपले काम सोडून लगेच मदतीला पोहोचले."
advertisement
6/7
रमेश यांनी ही माहिती दिली की, सतीश शाह यांच्यावर १६ जून रोजी कोलकाता येथे किडनी ट्रान्स्प्लांट शस्त्रक्रिया झाली होती. त्यानंतर त्यांची तब्येत ठीक होती, फक्त थोडे युरीन इन्फेक्शन झाले होते, त्यासाठी अँटिबायोटिक्स सुरू होती.
advertisement
7/7
'जाने भी दो यारो', 'हम आपके हैं कौन', 'मैं हूं ना', 'कल हो ना हो', 'दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे', 'ओम शांति ओम' यांसारख्या अनेक अजरामर चित्रपट आणि मालिकांमधून सतीश शाह यांनी चार दशकांहून अधिक काळ प्रेक्षकांचे मनोरंजन केले. त्यांच्या पार्थिवावर मुंबईतील विलेपार्ले येथील पवन हंस स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
Satish Shah Death : मृत्यूच्या वेळी सतीश शहांची बिकट अवस्था, मॅनेजरनेच सांगितलं शेवटच्या क्षणी नेमकं काय घडलं?