TRENDING:

Rama Duwaji : प्रसिद्ध डायरेक्टरची सून, न्यूयॉर्कची 'फर्स्ट लेडी', कोण आहे रमा दुवाजी?

Last Updated:
Who is Rama Duwaji: बॉलिवूडची प्रसिद्ध दिग्दर्शिका जिच्या नावावर अनेक दर्जेदार सिनेमे आहेत. तिने अनेक राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळवले आहेत. तिने ऑस्करपर्यंतही मजल मारली आहे. अशा या बॉलिवूड दिग्दर्शिकेची सून ही अमेरिकेच्या न्यूयॉर्कमध्ये असते. न्यूयॉर्कमध्ये तिला ब्युटी क्वीन म्हणून ओळखलं जातंय. तिचा नवरा न्यूयॉर्कचा महापौर आहे. रमा दुवाजी असं तिचं नाव आहे. कोण आहे ही रमा दुवाजी पाहूयात.  
advertisement
1/11
प्रसिद्ध डायरेक्टरची सून, न्यूयॉर्कची 'फर्स्ट लेडी', कोण आहे रमा दुवाजी?
न्यूयॉर्कच्या महापौरपदी जोहरान ममदानी हा सर्वात तरुण आणि पहिला भारतीय-अमेरिकन मुस्लिम महापौर म्हणून निवडून आला आहे. रमा दुवाजी ही जोहरान ममदानी यांची पत्नी आहे. रमा दुवाजी ही या प्रवासात जोहरान ममदानी यांची सायलेंट स्ट्रेंथ बनली आहे. सीरियन-अमेरिकन कलाकार असलेली रमा प्रवास आणि समाजातील स्टोरी लोकांसमोर आणत असते. जोहरान यांच्या प्रवासत ती पडद्यामागून काम करत होती.
advertisement
2/11
जोहरान ममदानी यांची पत्नी असण्याबरोबरत ती बॉलिवूड दिग्दर्शिका मीरा नायर यांची सून आहे. जोहरान ममदानी हे दिग्दर्शिका मीरा नायर यांचा मुलगा आहे. मीरा नायर यांनी 'सलाम बॉम्बे', 'मान्सून वेडिंग'सारखे अनेक दर्जेदार सिनेमे भारतीय सिनेसृष्टीला दिले आहेत. त्यांना ऑस्करसाठीही नामांकन मिळालं होतं.
advertisement
3/11
मीरा नायर यांची सून असण्याबरोबर रमा ही तिच्या नवऱ्यालाही भक्कम साथ देत आहे.  ती म्हणते प्रत्येक यशस्वी व्यक्तीमागे एक मजबूत व्यक्ती असते आणि न्यू यॉर्कच्या महापौरपदाच्या शर्यतीत आघाडीवर असलेल्या जोहरान ममदानीसाठी ती व्यक्ती त्याची पत्नी रमा दुवाजी होता.
advertisement
4/11
मीरा नायरचा मुलगा जोहरान चर्चेत असू शकतो, परंतु त्यांची सून अनेकदा कॅमेऱ्यापासून दूर राहते. कोणत्याही सार्वजनिक मुलाखती किंवा सोशल मीडिया अॅक्टिव्हिटीशिवाय ती जोहरानच्या कामात त्याला मदत करतेय.
advertisement
5/11
रमा दुवाजी ही 28 वर्षांची आहे. कलाकार असली तरी विचार खूप खोल आहेत.  सीएनएनच्या वृत्तानुसार, रमा सोशली समोर येत नसली तरी जोहरानच्या स्ट्रॅटेजी, प्रमोशनमध्ये तिचं महत्त्वपूर्ण योगदान आहे. कॅमेऱ्यापासून दूर असूनही ती या राजकीय प्रवासाची अदृश्य आर्ट डायरेक्टर बनली आहे.
advertisement
6/11
रमा एका कलात्मक वातावरणात वाढली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, तिचे पालक सीरियन-अमेरिकन आहेत आणि वेगवेगळ्या देशांमध्ये राहून तिने संस्कृती, ओळख आणि स्थलांतराच्या स्टोरीज जवळून अनुभवल्या. आहेत. या अनुभवांनी तिची कला अधिकच गहिरी झाली. एक चित्रकार आणि सिरेमिक कलाकार म्हणून तिने तिच्या कामांमध्ये मानवी कथा आणि भावनांचा समावेश केला.
advertisement
7/11
जोहरान आणि रमाची लव्हस्टोरी सिनेमाच्या सेटवर किंवा राजकीय मंचावर झाली नाही तर डेटिंग अॅपवर सुरू झाली होती. म्युझिक आणि स्थलांतरच्या स्टोरींच्या माध्यमातून ते एकमेकांना भेटले. रमाची फॅमिली  सीरियाहून अमेरिकेत आली होती तेव्हा जोहरानचे कुटुंब युगांडाहून भारतात आणि नंतर क्वीन्स, न्यू यॉर्क येथे गेले.
advertisement
8/11
दोघांनी डिसेंबर 2024 मध्ये दुबईमध्ये लग्न केले. 2025 च्या सुरुवातीला न्यू यॉर्क सिटी क्लर्कच्या कार्यालयात एका साध्या समारंभात लग्न केलं. त्यांचं लग्न अत्यंत साधं, प्रायव्हेट आणि  पूर्णपणे खरं होतं असं त्यांचे मित्र सांगतात.
advertisement
9/11
रमा मीडियापासून दूर राहणे पसंत करते. न्यू यॉर्क पोस्टमधील एका वृत्तात म्हटले आहे की ती जाणूनबुजून सार्वजनिक ठिकाणी जाणे टाळते. सोशल मीडिया पोस्ट नाही, मुलाखती नाहीत, राजकीय कार्यक्रमात ती सहभाग नाही. तिला तिच्या कामासाठी ओळखाने, प्रसिद्धीमुळे नाही असं तिचं म्हणणं आहे.
advertisement
10/11
"रमा एक हुशार कलाकार आहे जिचा स्वतःचा मार्ग आहे. मी भाग्यवान आहे की ती माझ्यासोबत आहे", असं जोहरानने सीएनएनशी बोलताला सांगितले.
advertisement
11/11
जर जोहरान ममदानी न्यूयॉर्कचे पुढचे महापौर झालेत. तर रमा दुवाजी या शहराच्या सर्वात तरुण फर्स्ट लेडी ठरली आहे आणि कदाचित एलूसिवही. तिला जे लोक ओळखतात ते सांगतात की, ती अत्यंत शांत स्वभावाची आहे. म्हणजे तो गूढ आहे असं नाही. ती एक विचारसरणी आहे. माणूस शब्दांमधून नाही तर कामातून बोलतो असा तिचा विश्वास आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
Rama Duwaji : प्रसिद्ध डायरेक्टरची सून, न्यूयॉर्कची 'फर्स्ट लेडी', कोण आहे रमा दुवाजी?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल