5 मिनिट 6 सेकंदाचं सुपरहिट गाणं ऐकताच थिरकायला लागतात पाय, माधुरीच्या दिलखेचक अदा लावतात वेड
- Published by:Manjiri Pokharkar
Last Updated:
Bollywood Superhit Song : भारतीय सिनेमांत आयटम साँगची एक वेगळीच क्रेझ पाहायला मिळते. ग्लॅमर, जोश आणि डान्सचा जबरदस्त तडका या गाण्यांमध्ये पाहायला मिळतो. थिएटरमध्ये गर्दी करायला ही गाणी फायदेशीर ठरतात आणि सोशल मीडियावरदेखील ही गाणी चांगलीच व्हायरल होतात. ही गाणी ऐकल्यावर आपोपाप प्रेक्षकांचे पाय थिरकायला लागतात.
advertisement
1/6

माधुरी दीक्षितला बॉलिवूडची 'डान्सिंग क्वीन' म्हटलं जातं. ‘एक दो तीन’, ‘चोली के पीछे’, आणि ‘धक धक करने लगा’ सारख्या गाण्यांनी तिला नृत्यात चांगलीच लोकप्रियता मिळवून दिली. माधुरीचं असंच एक गाणं 12 वर्षांपूर्वी आलं होतं, ज्याने प्रेक्षकांची मनं जिंकली होती. हे गाणं चित्रपटाच्या कथेपासून थोडं वेगळं होतं, पण तरीसुद्धा या गाण्याने स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली आणि आजही लोकांच्या आवडीचं गाणं आहे.
advertisement
2/6
‘घाघरा’ असं या गाण्याचं नाव आहे. या गाण्याच्या व्हिडिओमध्ये माधुरीसोबत रणबीर कपूर दिसला होता आणि दोघांची अफलातून केमिस्ट्री या गाण्याला अधिक संस्मरणीय बनवून गेली. माधुरीच्या कमबॅकवर प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिलं. हे गाणं रेखा भारद्वाज आणि विशाल ददलानी यांनी गायले होते. प्रीतमचे संगीत आणि अमिताभ भट्टाचार्य यांनी या गाण्याचे बोल लिहिले होते. या गाण्यात राजस्थानी फोक आणि आधुनिक बीट्सचा सुंदर संगम आहे. माधुरीची एन्ट्री तर जबरदस्त होती.
advertisement
3/6
‘घाघरा’ हे गाणं युट्यूबवर कोट्यवधी वेळा पाहिलं गेलं आहे. आजही हे गाणं पार्टी आणि डान्स प्लेलिस्टमध्ये लोकांची पहिली पसंती आहे. हे गाणं 2013 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘ये जवानी है दीवानी’ या चित्रपटाचा भाग होतं. चित्रपटाबरोबरच हे गाणंही रिलीज होताच सुपरहिट ठरलं. माधुरीचा पुनरागमन आणि रणबीरची एनर्जी यांनी या गाण्याला खास बनवलं. या गाण्याला यूट्यूबवर 100 मिलियनहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत आणि हे सोशल मीडियावर सतत ट्रेंड करत राहतं. त्याचे डान्स स्टेप्स अनेक रिअॅलिटी शोमध्ये पुन्हा सादर करण्यात आले.
advertisement
4/6
डान्सप्रेमींना या गाण्याचे बीट्स आणि बोल खूप आवडले. आजही हे गाणं लागलं की लोक थिरकल्या शिवाय राहू शकत नाहीत. हे गाणं माधुरीच्या करिअरमधील एक जबरदस्त कमबॅक ठरलं.
advertisement
5/6
‘ये जवानी है दीवानी’ अयान मुखर्जी दिग्दर्शित आणि करण जोहर निर्मिती चित्रपट होता. या चित्रपटात रणबीर कपूर, दीपिका पदुकोण, आदित्य रॉय कपूर आणि कल्की कोचली प्रमुख भूमिकेत होते. मैत्री, प्रेम आणि आयुष्याच्या प्रवासावर आधारित या चित्रपटाचं कथानक आहे.
advertisement
6/6
40 कोटींच्या बजेटमध्ये बनलेल्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर 319 कोटींहून अधिक कमाई केली. भारतातच नव्हे, तर परदेशातही प्रेक्षकांनी त्याला भरभरून प्रतिसाद दिला. चित्रपटाची सिनेमॅटोग्राफी, संगीत आणि कलाकारांची जोडी यांची खूप प्रशंसा झाली. रणबीर आणि दीपिकाची केमिस्ट्री तर आजही लोकांच्या मनात घर करून बसली आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
5 मिनिट 6 सेकंदाचं सुपरहिट गाणं ऐकताच थिरकायला लागतात पाय, माधुरीच्या दिलखेचक अदा लावतात वेड