"त्या वेळी जातीचे रंग थोडे फिकट होते"; धुळवडीनिमित्त कुशल बद्रिकेची पोस्ट चर्चेत
- Published by:Minal Gurav
Last Updated:
अभिनेता कुशल बद्रिकेनं कुटुंबाबरोबर धुळवड सेलिब्रेट केली. धुळवडीच्या फोटोंबरोबर कुशलनं खास पोस्ट देखील शेअर केली आहे.
advertisement
1/8

अभिनेता कुशल बद्रिके सध्या हिंदी टेलिव्हिजनवर प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे.
advertisement
2/8
कुशलनं देखील त्याच्या कुटुंबाबरोबर होळी आणि धुळवड साजरी केली.
advertisement
3/8
धुळवडीचे फोटो शेअर करत कुशलनं बालपणीच्या होळीच्या आठवणींना उजाळा दिला आहे.
advertisement
4/8
कुशलनं म्हटलंय, "माझ्या आयुष्याची होळी गेली कित्येक वर्ष 'फ्लॅट' संस्कृतीत पेटत्ये, पण माझी खरी होळी रंगली ती माझ्या बालपणी आमच्या 'चाळीत"
advertisement
5/8
"माझे पप्पा पहाटे चारला उठायचे आणि दिड-दोनशे फुगे पाण्याने भरून ठेवायचे".
advertisement
6/8
"मग रंग भरल्या पिचकारीची बंदूक आणि फुग्यांचे बॉम्ब घेऊन आमची वानरसेना दिसेल त्याच्यावर तुटून पडायची".
advertisement
7/8
"त्या वेळी जातीचे रंग थोडे फिकट आणि होळीचे रंग थोडे गडद होते, म्हणून कदाचित जगण्यात जे रंग उतरले त्याने अख्खं आयुष्य रंगीत करुन टाकलं".
advertisement
8/8
"आता मुलांना फुगे भरून देताना गाठी मारून गुलाबी झालेलं “पप्पांचं बोट” आपल्याच हाताला फुटलंय असं वाटतं आणि आता होळीत आपल्याला फुगे भरून देणारं कुणी नाही ही जाणीव ठुसठुसत राहते बोटभर"
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
"त्या वेळी जातीचे रंग थोडे फिकट होते"; धुळवडीनिमित्त कुशल बद्रिकेची पोस्ट चर्चेत