The Folk आख्यान : शाहिराची घाटोळी ऐकून भारावले दादा, थेट हातातलं घड्याळच काढून दिलं!
- Published by:Minal Gurav
Last Updated:
The Flok Aakhyan : संपूर्ण महाराष्ट्राला आपल्या तालावर नाचवणाऱ्या फोक आख्यानच्या शाहिराची घाटोळी ऐकून मंत्री चंद्रकांत पाटील भारावले. थेट हातातलं घड्याळ काढून भेट दिलं.
advertisement
1/10

सध्या संपूर्ण महाराष्ट्राला वेड लावणाऱ्या 'द फोक आख्यान'ची सर्वत्र चर्चा आहे. संपूर्ण महाराष्ट्रात 'फोक आख्यान'चे हाऊसफुल्ल शो सुरू आहेत.
advertisement
2/10
'थाट ह्यो जुना खेळ ह्यो नवा', असं म्हणत महाराष्ट्राच्या लोकसंगीताचा वारसा जपणारी ही मंडळी आज तरुणांसहीत सगळ्यांच्या मनावर राज्य करत आहेत.
advertisement
3/10
डीजे आणि वेस्टर्न म्युझिकवर थिरकणाऱ्या मंडळींनी आज 'फोक आख्यान' अक्षरश: डोक्यावर घेतलं आहे. या आख्यानाच्या निमित्तानं घाटोळी हा गायनप्रकार महाराष्ट्राला पुन्हा एकदा नव्याने कळला.
advertisement
4/10
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेक सोहळ्याशी संबंधित गाण्यांचा यात समावेश असतो.
advertisement
5/10
फोक आख्यानात आपल्या दमदार आवाजात घाटोळी सादर करणारा शाहीर चंद्रकांत माने खूप लोकप्रिय झाला.
advertisement
6/10
शाहिराच्या या घाटोळीची दखल संपूर्ण महाराष्ट्राने घेतलीच पण ती घाटोळी ऐकून मंत्री चंद्रकांत पाटीलही भावुक झाले.
advertisement
7/10
घाटोळी संपताच त्यांनी रंगमंचावर येऊन शाहीराचं कौतुक करत थेट आपल्या हातातलं घड्याळ काढून दिलं. शाहीर चंद्रकांत माने यानं सोशल मीडियावर पोस्ट लिहित चंद्रकांत पाटील यांच्याबरोबरचे काही फोटो शेअर करत पोस्टही लिहिली आहे.
advertisement
8/10
चंद्रकांत माने यानं लिहिलंय, "काल कोथरूड येथे द फोक आख्यानचा सांगेतिक थाट पार पडला. त्या दरम्यान महाराष्ट्राचे उच्च तंत्रशिक्षण मंत्री माननीय चंद्रकांत दादा पाटील यांनी रंगमंचावर येऊन मला त्यांच्या हातातील घड्याळ भेट दिले चंद्रकांत दादा पाटील मनपूर्वक धन्यवाद साहेब."
advertisement
9/10
शाहिरानं पुढे लिहिलंय, "माझ्यासारख्या एका छोट्या कलाकाराचा सन्मान केला , खरतर हा माझा नाही आपल्या लोककलेचा आणि शाहिरीचा सन्मान आहे."
advertisement
10/10
"हे सर्व द फोक आख्यानमुळे मला लाभलं. तुमच्या मुळे मला जो सन्मान आणि नाव मिळाल ते मी जीवनभर विसरू शकत नाही."
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
The Folk आख्यान : शाहिराची घाटोळी ऐकून भारावले दादा, थेट हातातलं घड्याळच काढून दिलं!