TRENDING:

'दशावतार' हिट कसा झाला? 'कांतारा' बनवणाऱ्या रिषभ शेट्टीने सांगितली कोणाला माहित नसलेली Inside story

Last Updated:
Rishab Shetty Talked About Dashavatar : एका खास मुलाखतीत ऋषभ शेट्टीने मराठी चित्रपटसृष्टीत गाजत असलेल्या अभिनेते दिलीप प्रभावळकर यांची मुख्य भूमिका असलेला आणि सुपरहिट ठरलेला 'दशावतार' चित्रपटाबद्दल आपले मत व्यक्त केले.
advertisement
1/6
'दशावतार' हिट कसा झाला? 'कांतारा' बनवणाऱ्या रिषभ शेट्टीने सांगितली Inside Story
कन्नड चित्रपटसृष्टीतील अभिनेता-दिग्दर्शक ऋषभ शेट्टी सध्या त्याच्या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या 'कांतारा: चॅप्टर १' च्या यशाने भारावून गेला आहे. मूळ भारतीय संस्कृती, परंपरा, श्रद्धा आणि निसर्ग-जंगलावर आधारित कथांना जगासमोर आणण्याचा तो एक सशक्त दुवा बनला आहे. माणसाला त्याच्या मातीशी जोडणाऱ्या आणि मुळांची ओळख करून देणाऱ्या कथांमध्ये ऋषभ शेट्टीला विशेष रस आहे.
advertisement
2/6
'ईटाईम्स'ला दिलेल्या एका खास मुलाखतीत ऋषभ शेट्टीने मराठी चित्रपटसृष्टीत गाजत असलेल्या अशाच एका आशयसंपन्न चित्रपटाबद्दल आपले मत व्यक्त केले. हा चित्रपट म्हणजे अभिनेते दिलीप प्रभावळकर यांची मुख्य भूमिका असलेला आणि सुपरहिट ठरलेला 'दशावतार'! बॉलिवूड आणि साऊथच्या चित्रपटांना तगडी टक्कर देत या मराठी चित्रपटानेही बॉक्स ऑफिसवर आपला ठसा उमटवला आहे.
advertisement
3/6
'दशावतार' चित्रपट पाहण्याची संधी मिळाली का, असे विचारल्यावर ऋषभ शेट्टी म्हणाला, "मी त्याबद्दल ऐकले आहे आणि खूप चांगला अभिप्रायही मिळाला आहे. पण सध्या मी आमच्या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त असल्यामुळे मला तो पाहता आलेला नाहीये. पण आमचा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर मी तो नक्कीच पाहणार आहे."
advertisement
4/6
या प्रकारच्या सांस्कृतिक कथांबद्दलचे आपले प्रेम व्यक्त करताना ऋषभ शेट्टी म्हणाला, "आपल्या मुळं, संस्कृती आणि जंगलाच्या कथांवर आधारित चित्रपट बनवले जात आहेत, ही खूपच चांगली गोष्ट आहे."
advertisement
5/6
तो पुढे स्पष्ट करतो, "हे विषय लोकांना कधीच कंटाळवाणे वाटत नाहीत; ते मनोरंजक असतात, लोकांना विचार करायला लावणारे असतात आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे, हे चित्रपट भविष्यातील पिढ्यांसाठी महत्त्वाचे दस्तऐवज म्हणून काम करतात."
advertisement
6/6
सुबोध खानोलकर दिग्दर्शित 'दशावतार' हा कोकणातील संस्कृती आणि सामाजिक समस्यांवर आधारित नाट्य-थरारपट आहे, ज्याने आतापर्यंत २७.७८ कोटी रुपयांचा गल्ला जमवला आहे. दुसरीकडे, ऋषभ शेट्टीचा 'कांतारा: चॅप्टर १' ५०० कोटीहून अधिक कमाई करत बॉक्स ऑफिसवर आपली यशस्वी घोडदौड कायम ठेवत आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
'दशावतार' हिट कसा झाला? 'कांतारा' बनवणाऱ्या रिषभ शेट्टीने सांगितली कोणाला माहित नसलेली Inside story
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल