लहानपणीची ती दिवाळी आठवते का? अंगणात उभा राहिलेला छोटासा किल्ला, मातीचा सुगंध, झेंड्याची उंच शान आणि बालपणाचा तो अभिमान. काळाच्या ओघात ही सुंदर परंपरा विरून चालली आहे... पण वारसा असा विसरायचा का? जशी क्रिकेटमध्ये प्रत्येक पिढी पुढच्या पिढीकडे वारसा सोपवते, तसंच आपल्या संस्कृतीचा वारसाही आपल्याला जपायचा आहे. मुंबई इंडियन्सच्या माध्यमातून आम्ही हा संदेश देतो आहोत – चला, या दिवाळीत पुन्हा एकदा किल्ला बांधूया, आपल्या संस्कृतीचं तेज जपूया!